
no images were found
अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात; सरकारच्या कारवाईविरोधात याचिका दाखल
सातारा : काल गुरूवारी (दि. १० नोव्हें.) रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफझल खानची कबर परिसरात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती. सरकारच्या या कारवाईमुळे अफझल खानची कबर चर्चेचा विषय बनलीय. या कारवाईनंतर आज याच कारवाईप्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या कारवाईला विरोध करणाऱ्या याचिकेबाबत सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद पार पडेल.