no images were found
मुंबई महापालिकेवर यंदा ‘भाजप’चा भगवा फडकणार-हेमंत पाटील: सत्ता वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित
पुणे,:राज्याच्या राजकीय पटलावर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नवनवीन घडामोडी घडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित ठाकरे बंधुंची युती हो-नाही म्हणता म्हणता, अखेर झाली. मात्र, भाजप सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत बराच पुढे निघून गेल्यावर ही यूती झाल्याने याचा फारसा परिणाम मुंबई महानगर पालिका निवडणुकीत जाणवणार नाही;असे स्पष्ट मत व्यक्त करीत यंदा मुंबईत ‘भाजप’चा भगवा फडकणार,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) व्यक्त केले.
मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव,राज ठाकरे यांनी भाजप सोबत जाणे हीच नैसर्गित युती होती. मात्र, उद्धव यांचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय अस्ताची नांदी ठरतेय, असे चित्र सध्या दिसून येतेय.मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी गेल्या काही वर्षात भाजपची शक्ती देशाच्या आर्थिक राजधानीत वाढली आहे. शिवसेनेचा मराठी मतदार भाजपकडे शिफ्ट झाला आहे.काही पॉकेट वगळले तर मनसेची फारशी राजकीय ताकद नाही,असे पाटील म्हणाले.
केवळ भावनिक मुद्द्यावर ठाकरे बंधु निवडणुकीला समोर गेले, तर त्यांचा पराभव निश्चित आहे.महापलिकेची सत्ता हाती असताना सुद्धा त्यांनी केलेली कामे सांगण्यात अपयशी ठरल्याने शिवसेना-मनसे युती यंदा तिसऱ्या स्थानावर फेकली जाईल, असा दावा पाटील यांनी केला.
मुंबईचे लचके भाजपला तोडायचे आहे, चिंधड्या करायच्या आहेत, असे खालच्या स्तरावरचे बिनबुडाचे आरोप करीत मराठी जनतेची ठाकरे दिशाभूल करीत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल, असे काम मराठी जनता करणार नाही; मात्र, याचा वापर राजकारणासाठी शिवसेना-मनसे करीत असेल तर ही मोठी शोकांतिका असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.