Home राजकीय आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे: शरद पवार  

आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे: शरद पवार  

2 second read
0
0
25

no images were found

आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे: शरद पवार  

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं आहे.

आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असं शरद पवार  यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. लोकांना कळत नाही. पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात. पक्ष म्हणजे संघटना असते. सदस्य असतात. आज देशात राष्ट्रवादी पक्षाची जी संघटना आहे. आमदार येतो आणि जातो. पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो. जे कोणी आमदार गेले असतील किंवा जाणार असतील, त्यांच्यावर संपूर्ण देशाची संघटना अवलंबून नाहीये.

आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे. पण या लोकांना राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला असता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं त्यांनी उत्तर दिलं. आता त्यांच्या लक्षात आलं की खरं बोलल्यावर आपल्या अंगलट येतंय. त्यावर काही तरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. पक्ष हा कुठे गेला नाही. आमचे आमदार काही 24 असतील, 25 असतील. काही लोक येऊन भेटतात, काही कामासाठी गेलो सांगतात. आम्ही आहोत सांगतात. आम्ही त्यांची तपासणी केली नाही. पण आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…