no images were found
आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरिक्षक, मुकादम, झाडू व सफाई कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान न केल्यास होणार दंड
कोल्हापूर (प्रतिनिधी ): महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कार्यरत सर्व आरोग्य निरिक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, मुकादम, झाडू व सफाई कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत गणवेश परिधान करणे सूचण्या सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. तरी काही आरोग्य निरिक्षक, सहाय्यक आरोग्य निरिक्षक, मुकादम, झाडू व सफाई कर्मचारी हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत गणवेश परिधान करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत गणवेश परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत गणवेश परिधान करत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत आरोग्य निरिक्षक यांना रु.१,०००/- प्रती दिन, सहाय्यक आरोग्य निरिक्षक यांना रु.१,०००/-, मुकादम यांना रू.८००/- व झाडू, सफाई कर्मचाऱ्यांना रु.५००/- प्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे दंडाची कारवाई होऊन देखील संबधीत कर्मचारी यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नसल्यास संबंधीत कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असलेचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज दिले आहेत.