Home मनोरंजन हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

36 second read
0
0
9

no images were found

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.                                                                               सोनी सबची हस्तिनापुर के वीर मालिका तरुण राजकुमारांच्या जडणघडणीच्या काळाचा मागोवा घेते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे तसेच पुढे ते जे बनतात त्याची पायाभरणी करणारे अनुभव उजेडात आणते. त्यांच्यातच राधे (व्यंकटेश पांडे) आहे, ज्याचं दयाळू मन आणि इतरांना मदत करण्याची नैसर्गिक वृत्ती कठीण परिस्थितीतही त्याच्या प्रत्येक कृतीला दिशा देत असते. मात्र, त्याचं कवच समोर आल्यानंतर गावकरी त्याच्याकडे एका दुष्ट शक्तीप्रमाणे पाहू लागतात, ज्यामुळे राधे आणि त्याच्या कुटुंबाला आपलं घर सोडून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाचा शोध घ्यावा लागतो.

    आगामी भागांमध्ये, राधे आणि त्याचं कुटुंब नवीन घराच्या शोधात जंगलातून प्रवास करत असताना, एक अनपेक्षित भेट त्याला अर्जुन (उर्वा सावालिया) समोर आणते. चिखलात अडकलेलं आपल्या गाडीचं चाक बाहेर काढण्यासाठी झगडत असलेला अर्जुन मदतीच्या प्रतीक्षेत असतो. आपल्या स्वभावाप्रमाणे, समोरचा माणूस नेमका कोण आहे हे न जाणूनही राधे अजिबात विलंब न करता त्याच्या मदतीला धावून जातो. दयाळूपणाचा हा साधासुधा वाटणारा प्रसंग या दोघांची पहिली भेट ठरतो आणि एका महत्त्वपूर्ण नात्याची सुरुवात घडवून आणतो. आधीच अनिश्चित भविष्याचा सामना करणाऱ्या राधेसाठी ही भेट एक नवा आणि उत्सुकता निर्माण करणारा प्रश्न उपस्थित करते.

अर्जुनसोबतची ही भेट राधेयच्या आयुष्याचा प्रवास त्यालाही अपेक्षित नसलेल्या प्रकारे बदलून टाकणार का?

आपल्या अनुभवाबद्दल सांगताना, वेंकटेश पांडे म्हणाले, “राधेयबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी गरजवंताला मदत करणे हीच त्याची पहिली प्रतिक्रिया असते. ही गोष्ट मला वैयक्तिकरित्या खूप जवळची वाटते, कारण माझा असा विश्वास आहे की एखादी व्यक्ती इतरांशी कशी वागते, विशेषतः जेव्हा ती स्वतः कठीण काळातून जात असते, यावरून तिच्या स्वभावाबद्दल बरेच काही समजते. राधेयने नुकतेच खूप काही सहन केले आहे. लोकांनी तो खरोखर कोण आहे हे न समजून घेताच त्याच्याबद्दल मत बनवले, त्याचा न्याय केला. तरीही तो त्या कटू अनुभवांचे ओझे मनात बाळगत नाही. जेव्हा तो अर्जुनला त्याची गाडी ढकलताना संघर्ष करताना पाहतो, तेव्हा क्षणाचाही विचार न करता तो त्याच्या मदतीला धावून जातो. प्रेक्षकांनी पाहावे, अशी माझी उत्सुकता आहे की दयाळूपणाचा हा दिसायला छोटासा वाटणारा क्षण त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठ्या गोष्टीची सुरुवात कसा ठरू शकतो.”

            

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए

अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए दुसऱ…