no images were found
अदाणी ग्रीन एनर्जीच्या ऊर्जा विक्रीत ३२% वाढ; एच१मध्ये ७,९५७ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए
दुसऱ्या तिमाहीत ईबीआयटीडीए ५१% वाढून ३,८३५ कोटी रुपयांवर; कार्यरत अक्षय ऊर्जा क्षमता २०.८ गिगावॅट
अहमदाबाद, : अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत आर्थिक आणि परिचालन कामगिरी नोंदवली आहे. कंपनीची ऊर्जा विक्री वार्षिक तुलनेत ३२% वाढून २५,७४७ दशलक्ष युनिट्सवर पोहोचली, तर वीज पुरवठ्यातून मिळणारा ईबीआयटीडीए ४१% वाढून ७,९५७ कोटी रुपयांवर पोहोचला. दुसऱ्या तिमाहीत ऊर्जा विक्रीत ३३% वाढ होऊन ती १२,०९० दशलक्ष युनिट्स झाली. याच कालावधीत वीज पुरवठ्यातून मिळणारा महसूल ४५% वाढून ४,०१९ कोटी रुपये, तर ईबीआयटीडीए ५१% वाढून ३,८३५ कोटी रुपये झाला. पहिल्या सहामाहीतील महसूल ३६% वाढून ८,२९९ कोटी रुपये झाला, तर रोख नफा ३५% वाढून ४,१७६ कोटी रुपयांवर पोहोचला.
कंपनीची कार्यरत अक्षय ऊर्जा क्षमता वार्षिक २४% वाढून २०.८ गिगावॅट झाली आहे. पहिल्या सहामाहीत कंपनीने ४,०८३ मेगावॅट नवीन हरित ऊर्जा क्षमता जोडली. यामध्ये गुजरातमधील खावडा येथे २,५६८ मेगावॅट आणि राजस्थानमध्ये ३८९ मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता, खावडा येथे ६६६ मेगावॅट आणि मुंद्रा येथे १३९ मेगावॅट पवन ऊर्जा क्षमता, तसेच खावडा येथे ३२१ मेगावॅट सौर–पवन हायब्रिड ऊर्जा क्षमतेचा समावेश आहे. या क्षमतावाढीमुळे कंपनीला २०३० पर्यंत ५० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रगती करता येत आहे. कंपनीने पहिल्या सहामाहीत सुमारे १७,१६० कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ३८% अधिक आहे.
ऊर्जा साठवण क्षेत्रातही कंपनीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत गुजरातमधील खावडा येथे ३,०८१ मेगावॅट–तास (MWh) बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे कंपनीची एकूण बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता ६,६३२ MWh म्हणजेच ६.६३ गिगावॅट–तास (GWh) झाली आहे. ही क्षमता भारतातील कार्यरत बॅटरी ऊर्जा साठवण क्षमतेच्या ५०% पेक्षा अधिक असून, एकाच ठिकाणी उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्पांपैकी हा एक आहे. सध्याच्य क्षमतावाढीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये १० GWh बॅटरी ऊर्जा साठवण क्षमतेचे उद्दिष्ट ओलांडण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
अदाणी ग्रीन एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशीष खन्ना म्हणाले की, भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी म्हणून क्षेत्राच्या प्रगतीला गती देण्यात कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या कार्यरत अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये वार्षिक २४% वाढ होऊन तो २०.८ गिगावॅटवर पोहोचला, तर ऊर्जा विक्रीत ३२% वाढ झाली. सौर, पवन आणि हायब्रिड ऊर्जा प्रकल्पांमधील मजबूत कामगिरीमुळे आर्थिक परिणामांमध्ये सुधारणा झाली. दुसऱ्या तिमाहीतही ऊर्जा विक्री आणि वीज पुरवठ्यातून मिळणाऱ्या महसुलात लक्षणीय वाढ झाली. खावडा येथील बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता ६.६३ GWh पर्यंत वाढल्यामुळे कंपनी भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण संचालक कंपनी ठरली आहे. पारेषण पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवून ऊर्जा साठवण क्षमतेचा विस्तार करणे हे कंपनीचे प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कंपनीच्या परिचालन कार्यक्षमतेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा वाटा आहे. एनर्जी नेटवर्क ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून देशभरातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर रिअल–टाइम देखरेख ठेवली जाते. त्यामुळे प्रकल्पांची उपलब्धता वाढण्यास, वीज निर्मिती सुधारण्यास आणि परिचालन व देखभाल खर्च कमी करण्यास मदत झाली आहे. कंपनीने ९३% इतके उद्योगातील आघाडीचे ईबीआयटीडीए मार्जिन नोंदवले आहे. खावडा येथे ५३८ चौरस किलोमीटर क्षेत्रात ३० गिगावॅट क्षमतेचा विशाल अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे क्षेत्रफळ पॅरिस शहराच्या जवळपास पाच पट आहे.