Home Uncategorized राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

6 second read
0
0
9

no images were found

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

  • रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रीतम देऊसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, : ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रमेश विठ्ठल थोरात, सिद्धार्थ शहाजीराव शिंगाडे आणि प्रीतम मधुकर देऊसकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’च्या संयुक्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

     या सोहळ्यात रमेश विठ्ठल थोरात यांना ‘अनटायटल्ड – II’ या तैलचित्रासाठी, सिद्धार्थ शहाजीराव शिंगाडे यांना ‘ट्रीज’ या मिश्र माध्यमातील कलाकृतीसाठी, तर प्रीतम मधुकर देऊसकर यांना ‘ऑफ टाइम अँड द सिटी’ या प्रिंटमेकिंगमधील कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २,४९५ कलाकारांच्या एकूण ६,१७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यातून पहिल्या टप्प्यात निवड समितीने २७० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली. त्यानंतर अंतिम निवड प्रक्रियेतून २० उत्कृष्ट कलाकृती राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आल्या होत्या. विविध कलामाध्यमांतील त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने महाराष्ट्राच्या कलाप्रतिभेचा गौरव झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.      …