Home सामाजिक घरफाळा 75 टक्के सवलत योजनेचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस सवलत योजनेतून थकीत 9 कोटी 12 लाख घरफाळा वसूल

घरफाळा 75 टक्के सवलत योजनेचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस सवलत योजनेतून थकीत 9 कोटी 12 लाख घरफाळा वसूल

1 min read
0
0
46

no images were found

घरफाळा 75 टक्के सवलत योजनेचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस सवलत योजनेतून थकीत 9 कोटी 12 लाख घरफाळा वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी ): महानगरपालिका करआकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर  थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने दंडव्याजामध्ये सवलत योजना जाहीर केली आहे.

या योजनेत दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी एका दिवसात 212 मिळकत धारकांनी 30,41,987/- रक्कम जमा केलेली आहे. दि.3 ते 30 सप्टेंबर 2025 अखेर 90 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. या सवलत योजनेस शहरवासायांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सदर सवलत योजनेमध्ये शहरातील 5,752 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेच्या थकीत 6 कोटी 87 लाख 38 हजार 335 इतका घरफाळा वसूल झाला आहे. या सवलत योजनेमधून नागरिकांना 3 कोटी 44 लाख 35 हजार 931 रूपयांची सवलत मिळाली.  तसेच दि. 1 ते 30 ऑक्टोबर 2025 अखेर 75 टक्के सवलत योजनेमध्ये शहरातील 2728 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेच्या थकीत 2 कोटी 25 लाख 12 हजार 532 इतका घरफाळा वसूल झाला आहे. यामध्ये 90 टक्के सवलत दि. 03 ते 30 सप्टेंबर 2025 अखेर व 75 टक्के सवलत दि.1 ते 31 ऑक्टोंबर 2025 अखेर देण्यात आली होती. या दोन्ही सवलत योजनेतून रुपये 9 कोटी 12 लाख 50 हजार 867 रुपये आजखेर जमा झाले आहेत.

शुक्रवार, दि.31 ऑक्टोंबर 2025 रोजी 75 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस असलेने कोल्हापूर महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तरी शहरातील जास्तीत जास्त थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…