no images were found
11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन गारगोटीत उत्साहात साजरा
कोल्हापूर, : गारगोटी येथील अशोका मल्टीपर्पज हॉलमध्ये उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने 21 जून रोजी 11 वा आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या घोषवाक्याचा आधार घेत सर्व नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन केले. योग हा दीर्घायुष्यासाठी सुवर्णमार्ग असून तो जीवनातील सर्व पैलूंमध्ये समतोल निर्माण करणारा व्यायाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतः योगप्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना प्रेरणा दिली आणि वर्षभर योगाचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री. करवळ यांनी योगासंबंधी मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकेही घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिलेला जागतिक संदेश दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षिपित करण्यात आला.
राज्यामध्ये योग संगम कार्यक्रमानिमित्त 60 हजार 668 शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील 1 हजार 158 संस्थांनी सहभाग घेतला. 2025-26 हे वर्ष खालील प्रमाणे साजरे करण्याचे आयुष मंत्रालयामार्फत सांगण्यात आले आहे.
योगा संगम : या कार्यक्रमाद्वारे सामुहिक योग प्रत्यक्षिके करणे
योगा बंधन : जागतिक देवाणघेवाण कार्यक्रम आणि ज्ञान सत्र
योगा पार्क: सार्वजनिक उद्याने यांना योगा पार्क म्हणून अपग्रेड करणे
योगा समावेश: लहान मुले (3 ते 6 वर्षे), गरोदर स्त्रिया, किशोरवयीन मुले (8 ते 16 वर्षे)
योगा प्रभाव : गेल्या 10 वर्षातील योगाचा भारतीय लोकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव
योगा कनेक्ट : आंतरराष्ट्रीय योगातज्ञ व धोरणकर्ते यांना एकत्रित करणे
हरित योगा :- आईसाठी एक वृक्ष, झाडे लावणे
योगा अनप्लगड :- युथला टारगेट करुन डान्स ड्रामा तसेच योग स्पर्धा घेणे योगा महाकुंभ: सलग एक आठवडा योग महोत्सव साजरा करणे
समयोगा:- आयुष पॅथी मधील आयुर्वेदिक होमिपॅथिक, नॅचरोपॅथी युनानी यामध्ये योगाचा समावेश करण्याबाबतची चर्चा व अनुभवाची देवाणघेवाण करणे.
जिल्ह्यातील आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत असलेल्या ठिकाणी किशोरवयीन मुलांसाठी योग संस्कार, सदृढ आरोग्यासाठी योग, महिला आरोग्य व योग, वार्धक्य अवस्थेतील व योग, बौध्कि विकास व योग, मानसिक तणाव नियंत्रण व योग या विषयावर शाळा व आरोग्य संस्थांमध्ये व्याख्याने घेण्यात येत आहेत.
श्री साताप्पा केणे योग प्रशिक्षण कर्मवीर हिरे महाविद्यालय व श्री शाहूकुमार भवन गारगोटी येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी देखिल योग प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले होते. योगा कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी तर आभार डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय अधिकारी यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ. दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर, अनिरुध्द पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, आनंद वर्धन तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. पल्लवी तारळकर, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय अधिकारी, तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय अधिकारी यांनी मानले.