no images were found
गुजरातमध्ये पूल कोसळून सुमारे १३२ जण मृत्युमुखी
मोरबी : गुजरात राज्यातील मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल कोसळल्याने जवळपास १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बेपत्ता असलेल्यांसाठी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असून राजकोट येथील खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदरिया यांच्या कुटुंबातील १२ सदस्य या घटनेत मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे.
खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदरिया यांचे कुटुंबीय छट पूजेच्या निमित्ताने केबल पुलावर गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. कुंदरिया बोलताना म्हणाले की, “माझ्या बहिणीच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू या अपघातात झाला असून त्यामध्ये २ लहान मुलांचा सामावेश आहे. बचावकार्य सुरू असून मच्छू नदीत बोटी दाखल केल्या आहेत” असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.
उपलब्ध माहितीनुसार घटनाक्रम असा रविवारी सायंकाळी मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडून अनेकजण नदीत वाहून गेले. दुर्घटनेची माहिती मिळताच ताबडतोब पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्य सूरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.