no images were found
आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात
आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद निवळल्याचे चित्र आहे. या प्रकरणी बच्चु कडूंनी पत्रकार परिषदेत रवी राणा यांची माफी मागितली. यामुळे राणा आणि कडू यांच्या वाद संपुष्टात आला आहे. आठवडाभर या दोन्ही नेत्यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच होता.
कडु म्हणाले, मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. राणा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे देखील यापुढे वाद नको म्हणून माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. यापुढे सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागत ‘मी दिलेले शब्द मागे घेतो म्हणत हा वाद संपवला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मी माझे शब्द मागे घेतो, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून कोणी दुखवले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेत वाद मिटविण्याचे प्रयत्नही सुरु केले होते. रवी राणा रविवारी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत हजर झाले होते. या प्रकरणी बच्चु कडूंनी पत्रकार परिषदेत रवी राणा यांची माफी मागितली. यामुळे राणा आणि कडू यांच्या वाद संपुष्टात आला आहे.