Home राजकीय शरद पवार तीन दिवस ब्रीच कँडीत ॲडमिट; सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार तीन दिवस ब्रीच कँडीत ॲडमिट; सर्व कार्यक्रम रद्द

0 second read
0
0
171

no images were found

शरद पवार तीन दिवस ब्रीच कँडीत ॲडमिट; सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचारासाठी ॲडमिट झाले आहेत. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. त्यामुळे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार आजपासून तीन दिवस रुग्णालयात दाखल होणार असल्याने या तीन दिवसातील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या तीन दिवसात कुटुंबाव्यतिरिक्त कोणाचीही भेट घेणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी पवार शिर्डीत येणार असून पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २ दिवसांच्या शिबीराला ते मार्गदर्शन करतील, अशी माहितीही देण्यात आली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…