no images were found
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे जाणार
नवी दिल्ली :- मागच्या 5 वर्षापासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. या पदासाठी बदल अपेक्षित असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहीती दिली आहे. अजित पवार यांनी भर कार्यक्रमात बोलून दाखवलेली इच्छा आणि आता बदलाचे वारे एकंदरित अजित दादांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाणार असल्याच्या दिशेने वाहू लागल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाअंतर्गत बदलांचे वारे वाहत आहे. कार्याअध्यक्ष पदापासून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार हे आता प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडून, संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी हा निर्णय कार्यकारिणीवर सोपवला असून, पार्टीचे नेते यावर निर्णय घेतील, असे म्हटले आहे. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रात काम करण्याचा दांडगा अनुभव असून, देखील सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रातील जबाबदारी सोपवली आहे. अशातच, आता महाराष्ट्रात देखील पक्षाअंतर्गत बदल होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.