Home क्राईम अग्नीशमन अधिकारी पवार याला लाच घेताना रंगेहात पकडले

अग्नीशमन अधिकारी पवार याला लाच घेताना रंगेहात पकडले

0 second read
0
0
41

no images were found

अग्नीशमन अधिकारी पवार याला लाच घेताना रंगेहात पकडले

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार याला सव्वा लाख रूपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

पवार याला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या सांगलीवाडीतील घरावर रात्री उशीरा छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घर झडतीमध्ये तब्बल सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड सापडली. त्याशिवाय काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. त्या अधिकाऱ्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

फायर सिस्टीम बसवणाऱ्या कंपनीला अंतिम ना हरकत दाखला देण्यासाठी पवार याने सुरुवातीला दीड लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सव्वा लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर संध्याकाळी सव्वा लाखांची लाच घेताना पवार याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार

    करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार   कोल्हापूर, (प्रतिनिधी):– तत्त्वज्ञा…