no images were found
महाराष्ट्रात ‘मंदोस’ चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मंदोस’ चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून) १३ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मंदोस’ चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून) १३ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पाउस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत होणार असल्याचा अंदाज असून या भागात रेड अलर्टही देण्यात आलेला आहे. दक्षिणेसह या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवेल. महाराष्ट्रात मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे.