Home राजकीय महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन सुरु

महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन सुरु

2 second read
0
0
41

no images were found

महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन सुरु

कोल्हापूर  : सीमा भागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेला आहे तरीही हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. आंदोलनात सीमा भागातील एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झालेले आहेत.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद सध्या पुन्हा पेटला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांनी जत तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील गावांवर कर्नाटकचा हक्क सांगितला असल्याने महाराष्ट्रामध्ये यावर  संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये सतेज पाटील ,हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील आदी आमदार तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधावडकर यांचाही सहभाग आहे.

सीमावासियांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीचे  धरणे आंदोलन आयोजित केले आहे, असे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागणार असल्याचा अंदाज आला असल्यामुळे सीमाभागा बद्दल काहीही बोलून लोकांची दृष्टी दुसरीकडे वळवण्याचा बेत असल्याचा त्यांनी आरोप केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…