
no images were found
गुंडांनी घरात घुसून केले युवतीचे अपहरण
तेलंगणा : तेलंगणा (जि. रंगा रेड्डी) येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आलेय. येथील आदिभटला परिसरातील १०० हून अधिक व्यक्तींनी घरात घुसून एका युवतीचे अपहरण करत आरोपींनी तिच्या घराची आणि गाड्यांचीही तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सदर कृत्त्यास विरोध करत असताना या आरोपी गुंडांनी पीडितेच्या वडिलास काठ्यांनी मारहाण केली. या घटनेची पीडितेच्या कुटुंबियांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सुमारे 100 लोक अचानकपणे त्यांच्या घरात घुसले. घुसल्यानंतर या आरोपीनी त्यांच्या २४ वर्षीय मुलीस वैशाली हिस जबरदस्तीने नेले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक तरुण घरात घुसून हल्ला करताना दिसत आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरु आहे.