
no images were found
कायाकल्प योजनेअंतर्गत पंचगंगा रुग्णालय राज्यात व्दितीय
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानअंतर्गत वैद्यकिय सेवा गुवत्तापुर्ण देणेसाठी शासनामार्फत कायाकल्प ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत रुग्णालयाची दर्जात्मक सेवा, रुग्णालय परिसर स्वच्छता, इमारत स्वच्छता इत्यादीबाबत राज्यस्तरावील समितीमार्फत मुल्यांकण करण्यात येते. सन 2022-23 मध्ये सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयाचे राज्य शासनाच्या समितीव्दारे मुल्यांकन करण्यात आले होते. या मुल्यांकनामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा रुग्णालयास राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तर सावित्रीबाई फुले रुग्णालयाची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली आहे. यामध्ये पंचगंगा रुग्णालयास बक्षीस म्हणून रुपये 10 लाखाचे व सावित्रीबाई फुले रुग्णालयास उत्तेजनार्थ म्हणून रु. 1 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त शिल्पा दरेकर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, आर.सी.एच. नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने, प्रशासन वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजश्री रोहिदास, डॉ.विद्या काळे आणि रुग्णालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.