Home क्राईम शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारताना गळफास लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारताना गळफास लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0 second read
0
0
168

no images were found

शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारताना गळफास लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कर्नाटक : शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारताना गळफास लागून कर्नाटकातल्या चित्रदुर्ग येथील १२ वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या शाळेतल्या कार्यक्रमाचा सराव करीत होता.

या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा प्रकार ज्यावेळी घडला तेंव्हा हा १२ वर्षीय मुलगा संजय गौडा घरी एकटाच असल्याचे कळते. त्याच्या आई-वडीलांचा हॉटेल व्यवसाय असून ते दोघे (नागराज आणि भाग्यलक्ष्मी) घराशेजारीच असणाऱ्या त्यांच्या हॉटेलकडे गेले होते. मुलाची आई रात्री ९ वाजता घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा धक्कादायक प्रकार आला.

मुलगा संजय गौडा सध्या सातवीमध्ये शिकत होता. त्याची आई शनिवारी रात्री हॉटेलमधून ९ च्या सुमारास घरी परतल्यावर तिला घर आतून लॉक असल्याचे आढळले. आईने बऱ्याचदा दार वाजवूनही  काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी खिडकीतून आत पाहिले असता त्यांना या मुलाचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी आपल्याकडच्या एका चावीने दार उघडून संजयला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी : विरोधकांनी राजकारण टाळ…