no images were found
मेक्सिकोत जमिनीखाली लागला अतिप्राचीन शहराचा शोध
मेक्सिको सीटी : मेक्सिकोत माया संस्कृतीशीसंबंधित एका अतिप्राचीन शहराचे अवशेष सापडले आहेत. जंगलात हे वसलेले शहर सापडले असून यात मंदिर, घर, बाजारपेठ कालवे असल्याचे पुरावे सापडले आहेत. हे शहर शोधण्यासाठी संशोधकांनी लेजर इमेंजिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.
मेक्सिकोतील कॅंपचे येथील घनदाट जंगलात हा शहराचे अवशेष सापडले आहेत. संशोधक कलकमुल आर्कियोलॉजिकल साइटजवळ अभ्यास करत असताना त्यांना हे अतिप्राचीन शहर सापडलं आहे. या शहरात अनेक प्राचीन अवशेष सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी जंगलाच्या आत दडलेल्या या शहराचा शोध घेण्यासाठी लेजर इमेंजिंग टेक्नोलॉजीचा LiDAR तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
टेक्सासमध्ये असलेल्या द नॅशनल सेंटर फॉर एअरबॉर्न लेजर मॅपिंगच्या (NCALM)सहाय्याने ९५ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या जंगलाचे सर्वेक्षण करण्यात आले. याशिवाय मेक्सिकोच्या हिडाल्गो प्रांतातील पचुआ येथील एरोटेक्नोलॉजीया डिजिटल एसए डी सीव्हीच्या तज्ञांनीही या मोहिमेत मदत केली होती.
माया सभ्येतेच्या खुणा असलेले हे शहर अमेरिकामध्ये असलेल्या सगळ्यात प्राचीन शहर असल्याचं बोललं जात आहे. संशोधकांच्या अनुमानानुसार इथली लोकसंख्या ५० हजारापर्यंत असेल. तर, १५० किलोमीटर परिसरात हे शहर वसलं होतं. ६०हून अधिक बांधकामाचे अवशेष जमिनीखालील सापडले आहे. कलकमुल हे माया पुरातत्व स्थळ असून ते कॅम्पेचे येथे आहे सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झाली आहे. संशोधकांच्या अनुमानानुसार इथली लोकसंख्या ५० हजारापर्यंत असेल. तर, १५० किलोमीटर परिसरात हे शहर वसलं होतं. ६०हून अधिक बांधकामाचे अवशेष जमिनीखालील सापडले आहे. कलकमुल हे माया पुरातत्व स्थळ असून ते कॅम्पेचे येथे आहे. हे ठिकाण बेसिन प्रदेशातील जंगलांच्या मध्यभागी आहे. माया संस्कृतीतील हे सर्वात शक्तीशाली आणि सर्वात जुने शहर असावे, असा दावा केला जात आहे. माया पुरातत्व स्थळ ग्वाटेमालाचा सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झाली आहे.