no images were found
१६८ योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी अभियान राबविले – एजाज देशमुख
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्यांनी देशावर सत्तर वर्षे राज्य केले, पण सर्वसामान्य देशवासी अडचणींत असताना पाठ फिरवली पण नरेंद्र मोदींच्या उदार भुमिकेमुळे कोराना काळात सर्वसामान्यांच्या चुली पेटल्या. तब्बल १६८ योजनांच्या माध्यमातून मोदींनी सर्वसामान्यांना अन्नधान्य, मुद्रा कर्ज, शिष्यवृत्ती, उज्वला ॻॅसपासुन विविध प्रकारच्या योजना देशभरात पोचवल्या यासाठीच धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत आहे. देशवासीयांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी कोल्हापूरात बैठकीत बोलताना केले.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानी एजाज देशमुख (भाजपा प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र राज्य) हे होते. या बैठकीत बोलताना एजाज देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी यांच्या कडुन 20000/ हजार आभार पत्रे पंतप्रधान मोदींना जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांनी विक्रमी संख्येने ही आभार पत्रे संकलित करण्याची ग्वाही यावेळी दिली. या बैठकीत अल्पसंख्याक मोर्चा युवा शाखा पदाधिकाऱ्यांना हाजी एजाज देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी अतिक खान, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा प्रभारी अॅड. तब्बसुम बैरागदार, दिलीप मैत्राणी, गणेश देसाई, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, आकाश मुल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे झाकीर जमादार, शाहरूख गडवाले भाजपा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापुर महानगर, फैयाज अथनिकर भाजपा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापुर महानगर, नवाब शेख, हिंडोडी, सलीम मुजावर, उमेश जाधव, शाहनवाज शेख, नाजिम आतार, सादिक जमादार, आयान जमादार, राजू शेख, नियाज पटेल, छाया सलूखे, ज्योति चौपदे, सागर केगारे, वसीम शेख, गुलाब मुल्ला, शादाब खान, नियाज पटेल असर खान, राजू शेख, पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.