Home क्राईम प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला अटक  

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला अटक  

0 second read
0
0
105

no images were found

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला अटक

बंगळूरु : प्रियकराशी लग्न करण्यासाठी बायकोने आपल्याच नवऱ्याची पतीची हत्या केली. तिने हत्या कर केली पण आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला आणि या हत्येचा आरोप तिने तिचा पाठलाग करणाऱ्या एका व्यक्तीवर टाकला. बंगळुरुच्या येलाहंका भागात एका २१ वर्षीय महिलेला आणि तिच्या प्रेयसीला तिच्या नवऱ्याची हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पत्नीचं नाव श्वेता असून तिच्या प्रियकराचे नाव सुरेश ( वय २५) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रशेखर (वय ३९) हा व्यवसायाने विणकर असून २१ ऑक्टोबर रोजी येलहंका येथील कोंडाप्पा ले-आऊटमधील इमारतीच्या छतावर त्याचा प्रायव्हेट कापलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला श्वेता हिने लोकेश नावाच्या व्यक्तीवर या हत्येचा आरोप केला होता. लोकेश हा तिचा पाठलाग करायचा, असा आरोप महिलेने केला आहे. डिसेंबरमध्ये श्वेताने लोकेशविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, श्वेताने आपल्या नवऱ्याच्या हत्येमागे लोकेशचा हात असल्याचे सांगितले असले तरी आम्हाला तिच्या सांगण्यावर विश्वास नाहीये. कारण, तिच्या सांगण्यात अनेक चुकीच्या गोष्टी आढळून आल्या आणि ती तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. संशयावरून पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता नवऱ्याच्या हत्येत तिचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

श्वेता सुरेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण ६ महिन्यांपूर्वी चंद्रशेखरसोबत जबरदस्तीने लग्न केल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रशेखर आणि श्वेता लग्नानंतर लगेचच बंगळुरुला गेले, पण श्वेताचे सुरेशसोबतचं नातं कायम राहिलं. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, श्वेता आणि सुरेश हे दोघं चंद्रशेखरच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी भेटायचे. ऑगस्टमध्ये चंद्रशेखरला त्यांच्या नात्याबद्दल कळले आणि त्याने श्वेताला सुरेशला न भेटण्याची ताकीद दिली.
त्या दोघांनी चंद्रशेखरला मारण्याचा कट रचला. श्वेताला चंद्रशेखरच्या हत्येसाठी तिचा पाठलाग करणाऱ्या लोकेशला दोषी ठरवायचे होते, परंतु तिच्या कॉल रेकॉर्डवरून तिचे सुरेशसोबतचे प्रेमसंबंध उघड झाले आणि तिने तिच्या नवऱ्याच्या हत्येची योजना आखल्याचे उघड झाले. सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …