no images were found
गौतम अदाणी यांनी आयआयटी खडगपूर मधून भारताच्या ‘दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामा’चे आवाहन केले
- नव्या युगातील युद्धांची दिली चेतावणी, जी बंदुकांमध्ये किंवा खंदकांमध्ये नाही, तर डेटा, अल्गोरिदम आणि सर्व्हरमध्ये लढली जातील.
- म्हटले की, खरी स्वातंत्र्य आत्मनिर्भरतेत आहे, परदेशी सेमीकंडक्टर किंवा ऊर्जेवर अवलंबून राहण्यात नाही.
- गौतम अदाणी यांनी आयआयटी खडगपूरच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने मोठ्या फेलोशिपची घोषणा केली.
खडगपूर,:-अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी सोमवारी भारताला “दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामा”ची सुरुवात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की हा संग्राम वसाहतवादी सत्ताधीशांविरुद्ध नसून परकीय तंत्रज्ञान, ऊर्जा आणि डेटा प्रणालींवर अवलंबून राहण्याविरुद्ध असेल. ते आयआयटी खडगपूरच्या हिरक जयंती समारंभात बोलत होते.
आता युद्ध खंदकांमध्ये नाही तर सर्व्हर फार्ममध्ये लढली जातात
गौतम अदाणी म्हणाले की भारताने जरी १९४७ मध्ये राजकीय बेड्या तोडल्या असल्या तरी २०२५ मध्येही आयात केलेल्या सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि लष्करी प्रणालींवर अवलंबून राहिल्याने देश बाह्य शक्तींसमोर असुरक्षित राहतो.अदाणी यांनी शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांनी भरलेल्या सभागृहात म्हटले,”आज आपण जी युद्धे लढत आहोत, ती अनेकदा अदृश्य असतात. ही युद्धे सर्व्हर फार्ममध्ये लढली जातात, खंदकांमध्ये नाही. या शस्त्रांचे नाव अल्गोरिदम आहे, बंदुका नाहीत. ही साम्राज्ये जमिनीवर नाही, तर डेटा सेंटरमध्ये निर्माण होतात.”आयआयटी विद्यार्थ्यांना “भारताचे नवे स्वातंत्र्यसैनिक” संबोधून, अदाणी म्हणाले ,त्यांची शस्त्रे म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन करताना ते म्हणाले की तुम्ही राष्ट्रनिर्मितीचा मार्ग निवडावा.ते म्हणाले “एक रस्ता तुम्हाला फक्त पगारापर्यंत घेऊन जातो. दुसरा तुम्हाला वारशापर्यंत पोहोचवतो. पण फक्त एकच रस्ता भारतनिर्मितीच्या गौरवाच्या दिशेने नेतो.”त्यांनी १६ व्या वर्षी घर सोडून मुंबईला जाण्याच्या प्रवासापासून ते भारतातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा समूह उभा करण्याच्या प्रवासाचे उदाहरण दिले.
यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी दिले मंत्र
या प्रसंगी अदाणी यांनी विद्यार्थ्यांशी यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काही मंत्र शेअर केले. त्यांनी सांगितले की”जो खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचारांचा आहे, जो जोखीम घेण्यास, जलद निर्णय घेण्यास आणि नुकसान सहज स्वीकारण्यास तयार आहे, तोच खरा चांगला व्यावसायिक होऊ शकतो.”त्यांनी पुढे सांगितले की खाजगी क्षेत्रातील कोणतीही कंपनी तेव्हाच प्रगती करू शकते जेव्हा ती दूरदर्शी सरकारच्या धोरणांशी ताल धरून चालते. मागील दशकात सरकारवरील हा विश्वास, भारताच्या क्षमतेवरील श्रद्धा आणि धोरणांवरील माझा विश्वास यांनीच आम्हाला भारतातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा समूह बनवला आहे.
विद्यार्थ्यांसाठी नवी फेलोशिप
या प्रसंगी गौतम अदाणी यांनी “आयआयटी प्लॅटिनम जुबिली चेंज मेकर्स फेलोशिप” सुरू करण्याची घोषणा केली. ही सर्व आयआयटी संस्थांमध्ये सुरू केली जाईल आणि आयआयटी खडगपूरद्वारे समन्वित केली जाईल. यामध्ये राष्ट्रीय प्राधान्यांच्या प्रकल्पांमध्ये शीर्ष प्रतिभांना सहभागी करून घेण्यात येईल.या फेलोशिपअंतर्गत देशातील उत्तम प्रतिभांना नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि स्मार्ट मोबिलिटीशी संबंधित राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेतले जाईल.त्यांनी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भागीदारीचे नवे रूप पुन्हा विचारात घ्यावे असे म्हटले. विद्यापीठांनी संशोधनाच्या सीमांना पुढे नेण्यासाठी कॉर्पोरेट्स पुढे यायला हवेत. दोघांनी मिळून केवळ बाजारपेठांवर नाही तर समाजाच्या रचनेवरही प्रभाव पाडायला हवा.
राष्ट्रीय संकल्पाने भाषणाचा समारोप
अदाणी म्हणाले इतके मजबूत व्हा की कोणताही भय आपल्याला जखडू शकणार नाही. इतके उंच उठा की कोणतेही साम्राज्य आपल्याला झुकवू शकणार नाही. इतके बलवान बना की कोणतीही ताकद आपल्याला अडवू शकणार नाही. आपला भारत तुमची वाट पाहत आहे.”