no images were found
अदाणी फाउंडेशनने गौतम अदाणी यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त केले देशव्यापी रक्तदान अभियान आयोजित
अहमदाबाद, : अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांच्या 24 जून रोजी झालेल्या 64 व्या वाढदिवसानिमित्त, समूहाची सामाजिक-आर्थिक आणि विकासात्मक शाखा असलेल्या अदाणी फाउंडेशनने उत्सवाचा दिवस सेवा, करुणा आणि आशेच्या देशव्यापी उपक्रमात रूपांतरित केला. या उपक्रमात भारतभरातील हजारो रक्तदात्यांनी सहभाग घेत जीव वाचविण्याच्या कार्यात हातभार लावला.
फाउंडेशनचा वार्षिक मेगा रक्तदान उपक्रम 21 राज्ये, पाच केंद्रशासित प्रदेश आणि चार आंतरराष्ट्रीय ठिकाणांतील 754 हून अधिक शहरांमधील 764 पेक्षा अधिक रक्तपेढ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या उपक्रमात एकूण 52,306 युनिट रक्त संकलित करण्यात आले, ज्याने मागील वर्षीच्या 28,090 युनिट्सच्या विक्रमालाही मागे टाकले.
अदाणी हेल्थकेअर टीमच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत समाजसेवा ही सर्वोच्च योगदानांपैकी एक असल्यावरील श्री. अदाणी यांचा दृढ विश्वास प्रतिबिंबित झाला. त्यांच्या “सेवा ही साधना आहे” या तत्त्वज्ञानातून प्रेरित झालेल्या या उपक्रमाने वैयक्तिक उदारतेच्या कृतींना एकत्र आणत असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची सामूहिक शक्ती निर्माण केली.
या अभियानातून संकलित करण्यात आलेले सुमारे 23,538 लिटर रक्त, संपूर्ण रक्त, पॅक्ड सेल व्हॉल्यूम (पीसीव्ही), प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट्स, प्लाझ्मा, फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा (एफएफपी), क्रायोप्रेसिपिटेट आणि अल्ब्युमिन यांसारख्या महत्त्वपूर्ण रक्तघटकांच्या उपलब्धतेद्वारे 1,56,918 हून अधिक रुग्णांना लाभदायक ठरण्याची अपेक्षा आहे. हे रक्तघटक आपत्कालीन उपचार, मोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, मातृ आरोग्य सेवा आणि दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले,“गौतम यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘सेवा ही साधना आहे’ या विश्वासाला अदाणी परिवाराने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान मोहिमेद्वारे सुंदर स्वरूप प्राप्त झाले.52,306 युनिट रक्त. 6,000 पेक्षा अधिक स्वयंसेवक. भारत आणि परदेशातील 750 हून अधिक ठिकाणे. हात पुढे करून या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक अदाणियन आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तुमच्या सेवाभावी कृतीमुळे 1,56,900 हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आशा आणि बळ मिळेल.”
या उपक्रमाचे व्यापक स्वरूप देशभरातील रेड क्रॉस रक्तपेढ्या, सरकारी रुग्णालये आणि विश्वस्त संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रक्तपेढ्यांशी झालेल्या निकट सहकार्यामुळे शक्य झाले. अदाणी समूहातील डॉक्टर, पॅरामेडिक्स, डेटा ऑपरेटर्स आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह 6,000 हून अधिक स्वयंसेवकांनी या मोहिमेची सुरक्षित आणि सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम केले.
2011 मध्ये अवघ्या 1,300 हून अधिक युनिट रक्तदानापासून सुरू झालेला हा उपक्रम आज एक स्थायी वार्षिक परंपरा बनला आहे, जो श्री. अदाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य समाजसेवेद्वारे साजरे करतो. कालांतराने हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या स्वैच्छिक रक्तदान मोहिमांपैकी एक बनला असून, कर्मचारी, भागीदार आणि समुदायांना जीव वाचविण्याच्या सामायिक ध्येयासाठी एकत्र आणत आहे.
अदाणी फाउंडेशनसाठी हा उपक्रम सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या व्यापक बांधिलकीचे प्रतीक आहे. सहभागाचे प्रमाण आणि संकलित रक्ताचे प्रमाण यापलीकडे जाऊन, हा उपक्रम अर्थपूर्ण बदल अनेकदा साध्या दयाळूपणाच्या कृतींमधून सुरू होतो याची आठवण करून देतो.
देशभरातील विविध भौगोलिक भाग, भाषा आणि समुदायांमधील रक्तदाते पुढे सरसावले असताना, “सेवा ही साधना आहे” या भावनेला तिचे सर्वात प्रभावी रूप प्राप्त झाले—स्वतःचा एक भाग देऊन दुसऱ्याला जीवनाची दुसरी संधी देण्याचे.