Home राष्ट्रीय विद्यापीठात राष्ट्रीय फौंड्री दिनानिमित्त प्रशांत बोरा यांचे विशेष व्याख्यान

विद्यापीठात राष्ट्रीय फौंड्री दिनानिमित्त प्रशांत बोरा यांचे विशेष व्याख्यान

5 second read
0
0
37

no images were found

विद्यापीठात राष्ट्रीय फौंड्री दिनानिमित्त प्रशांत बोरा यांचे विशेष व्याख्यान

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : ७६ व्या राष्ट्रीय फौंड्री दिनाच्या निमित्ताने पुणे येथील बोरा मल्टिकॉर्पचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोरा यांचे विशेष व्याख्यान शिवाजी विद्यापीठात येत्या गुरूवारी (दि. २१) आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठ आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमन या संस्थेचे कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजिले आहे.

     विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात गुरूवारी ४ वाजता प्रशांत बोरा यांचे ‘स्केलिंग बियाँड कम्फर्ट झोन्स’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील असतील. या व्याख्यानास फौंड्री उद्योगाशी निगडित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ-उद्योग साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, समन्वयक डॉ. सुभाष माने, फौंडेशनचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडूकर यांनी केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…