no images were found
बुद्धिबळ स्पर्धेत ॲनाकोंडा टीम अजिंक्य; केन किंग्ज टीम उपविजेता तर कोल्हापूर वॉरियर्स तृतीय स्थानी
सोमवार (प्रतिनिधी):- केन इंडिया फाउंडेशन व केन चेस अकॅडमी,इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री स्वकुल साळी समाजाच्या सहकार्याने पहिल्यांदाच इचलकरंजी मध्ये आयोजित केलेल्या केन खुल्या सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा मोठा दिमाखात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर रवींद्र निकम, उत्कर्ष लोमटे, उमेश कुलकर्णी व श्रीधर तावडे यांचा समावेश असलेल्या अग्रमानांकित ॲनाकोंडा टीमने तेरा गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले.त्यांना विजेतेपदाचे रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. करण दबडे मयुरेश पाटील हेमंत भोसले व आदित्य ठाकूर यांच्या आठवा मानांकित केन किंग टीम ने बारा गुणासह उपविजेतेपदावर मुसंडी मारली. त्यांना द्वितीय क्रमांकाचे रोख तीन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले. आदित्य सावळकर सोहम खासबारदार, प्रणव पाटील व सारंग पाटील यांचा समावेश असलेल्या द्वितीय मानांकित कोल्हापूर वॉरियर्सला अकरा गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविले.चेस वॉरियर्स चा चौथा क्रमांक आला तर चेकमेट वॉरियर्सला पाचवे स्थान मिळाले. आयसीए नाईट रायडर्स व आयसीए वॉरियर्सला अनुक्रमे सहावे व सातवे स्थान मिळाले. पहिल्या सात क्रमांकांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविले.
श्री.स्वकुल साळी समाज सांस्कृतिक हॉल, इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रकेन इंडिया फाउंडेशनचे उद्योजक निकुंज बगडिया, व श्री.स्वकुल साळी समाज,इचलकरंजीचे अध्यक्ष रमेश कनोजे, विशाल गिरंगे, रामसागर पोटे व रोहित पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच झालेल्या या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा जयसिंगपूर व स्थानिक इचलकरंजी येथील विक्रमी 56 संघाचे प्रत्येकी चार याप्रमाणे 224 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात झाली.
*उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे*
सर्वोत्तम दहा वर्षाखालील शालेय संघ- गंगामाई हायस्कूल (इचलकरंजी ) .रोख ५०० रु.+🏆
सर्वोत्तम सोळा वर्षाखालील शालेय संघ-
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल
अतिग्रे.रोख ५०० रु.+🏆.
सर्वोत्तम महिला संघ-
केन क्वीन्स वॉरियर्स रोख ५०० रु.+🏆.
सर्वोत्कृष्ट बाल खेळाडू मनस्वी कोळेकर (५ वर्ष)🏅 पदक देवुन गौरविले.
बोर्ड बक्षिसे खालीलप्रमाणे
बोर्ड क्रमांक १.
तावडे श्रीधर. (सुवर्णपदक)🥇
दबडे करण (रौप्य पदक) 🥈
कांबळे संतोष.(कांस्य पदक)🥉
बोर्ड क्रमांक २.
उत्कर्ष लोमटे (सुवर्णपदक)🥇
खासबरदार सोहम (रौप्य पदक)🥈
कुलकर्णी अरीन .(कांस्य पदक)🥉
बोर्ड क्रमांक ३.
आदित्य सावळकर.(सुवर्णपदक)🥇
तन्मय पवार,(रौप्य पदक)🥈
सोनी विवान,(कांस्य पदक)🥉
बोर्ड क्रमांक ४.
पल्ले ज्ञानराज(सुवर्णपदक)🥇
डोळे तनिशकुमार (रौप्य पदक)🥈
निकम रवींद्र(कांस्य पदक).🥉
या सांघिक स्पर्धेसाठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच करण परीट हे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत त्यांना दीपक वायचळ,रोहित पोळ ,मोहिनीराज डांगे, विजय सलगर व श्रुती कुलकर्णी सहाय्यक पंच म्हणून सहकार्य केले .