Home बँकिंग एचडीएफसी बँकेने नागरिकांना एपीके फसवणुकीबाबत सावध राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला

एचडीएफसी बँकेने नागरिकांना एपीके फसवणुकीबाबत सावध राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला

1 min read
0
0
62

no images were found

एचडीएफसी बँकेने नागरिकांना एपीके फसवणुकीबाबत सावध राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला

मुंबई, : भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ग्राहकांना एपीके (अँड्रॉईड पॅकेज किट) फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या फसवणुकीविषयी जागरूकता वाढवून ग्राहकांचे संरक्षण करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

एपीके फसवणुकीमध्ये फसवणूक करणारे सहसा बँकेचे कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची संपर्क करतात. . ते एखादा मेसेज पाठवतात ज्यात एक एपीके फाइल (मोबाईल अ‍ॅपसारखी फाइल) असते, ही फाइल बनावट असते पण ती सरकारी संस्था किंवा बँकेकडून आल्यासारखी वाटते. जेव्हा कोणी ती फाइल डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो, तेव्हा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला संबंधित मोबाईल फोनवर पूर्ण अ‍ॅक्सेस मिळते. त्यामुळे तो फसवेखोर मोबाईलवरील कॉल्स आणि मेसेज दुसऱ्या डिव्हाईसकडे वळवू शकतो आणि मोबाईलमधील माहिती चोरू शकतो, बँक खात्यात प्रवेश मिळवून परवानगीशिवाय पैसे ट्रान्सफर करू शकतो. म्हणूनच, एचडीएफसी बँकेने ग्राहकांना अशा फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे..   

ही फसवणूक कशी केली जाते:

1.    फसवणूक करणारे सामान्यतः सरकारी अधिकारी, बँकेचे कर्मचारी किंवा प्रसिद्ध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. ते री-केवायसी करणे, ट्रॅफिक चालान भरणे, इनकम टॅक्सचा परतावा मिळवणे इत्यादी कारणांवरून संपर्क करतात. अशा वेळी, पीडिताला एक बनावट एपीके लिंक असलेला मेसेज पाठवतात.

2.    पीडित व्यक्ती त्या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या मोबाईलमध्ये एक मालवेअर (सॉफ़्टवेअर व्हायरस) नकळतपणे इन्स्टॉल होतो आणि त्यांना त्याची कल्पनाही राहत नाही.

3.    या मालवेअरच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पीडिताच्या मोबाईलवरील पूर्ण अ‍ॅक्सेस मिळते.

4.    त्यानंतर काही मिनिटांतच बऱ्याच अनधिकृत आर्थिक व्यवहारांची सुरुवात होते आणि ग्राहकांचे आर्थिक नुकसान होते. मोबाईलवर बँकेकडून पैसे कट झाल्याचे मेसेज मिळाल्यावर पीडिताला फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

काही उदाहरणे:

(अ) फसवणूक करणारे लोक फोन कॉल, ई-मेल किंवा मेसेजद्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात आणि बँकेकडून बोलत असल्याचे सांगतात. ते म्हणतात की केवायसी तात्काळ अपडेट करणे आवश्यक आहे, नाहीतर खाते बंद होईल अशी भीती दाखवतात. त्यानंतर एक बनावट एपीके लिंक पाठवतात ज्यामध्ये बँकेचा लोगोही असू शकतो आणि ती अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगतात. हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर ग्राहकांना त्यांचे बँक खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्ड माहिती, ओटीपी वगैरे टाकण्यास सांगितले जाते, आणि ही माहिती त्वरित चोरली जाऊन फसवणुकीसाठी वापरली जाते.

 (ब) काही वेळा फसवेखोर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) चे अधिकारी असल्याचे सांगतात. ते लोकांना ई-चलान भरायचा आहे, असे सांगणारे बनावट मेसेज किंवा ईमेल पाठवतात. त्या मेसेजमध्येही धोकादायक एपीके लिंक असते. वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक होतो, आणि फसवणूक सुरू होते.

एपीके फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:

·         सोशल मिडिया, एसएमएसकिंवा ईमेलद्वारे आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, तसेच आरटीओ, इनकम टॅक्स विभाग किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या नावाने आलेल्या अ‍ॅप्स किंवा फाईल्स इन्स्टॉल करू नका.

·         आपल्या मोबाईल किंवा उपकरणामध्ये विश्वासार्ह अँटीव्हायरस किंवा अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे, जे अशा धोकादायक फाइल्स ओळखून त्यांना ब्लॉक करू शकते.

·         कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून सांगितल्यावर थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. अ‍ॅप्स नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत अ‍ॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा.

·         कोणताही मेसेज किंवा ईमेल खरा आहे की बनावट, हे नेहमी त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून तपासून पाहा.

·         कोणताही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ईमेल आल्यास याबाबत https://sancharsaathi.gov.in/ या Chakshu पोर्टलवर किंवा संचार साथी मोबाईल अ‍ॅपवर त्वरित तक्रार नोंदवा.

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना “डिजिटल अरेस्ट” सारख्या फसवणुकींपासूनही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारात फसवणूक करणारे कायदा अंमलबजावणी अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात आणि पीडित व्यक्तीला सांगतात की तुमच्यावर टॅक्स चोरी, आर्थिक गैरव्यवहार, नियमांचे उल्लंघन  केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तुमच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट जारी केला आहे, असे सांगून ते पैसे उकळतात. तसेच, आणखी एक सामान्य फसवणूक म्हणजे गुंतवणूक फसवणूक. या प्रकारात फसवेखोर लोकांना शेअर्स, आयपीओ, क्रिप्टोकरन्सी यामध्ये गुंतवणुकीवर अस्वाभाविक जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवतात. हे सर्व बनावट ऑटोमेटेड प्लॅटफॉर्मवरून आणि सोशल मीडियावर जाहिरात करून केले जाते. फसवेखोर भावनांचा वापर करून लोकांची फसवणूक करतात, ज्याला ते जीटीएच – लोभ दाखवणे (Greed), भीती निर्माण करने (Threat) आणि मदतीचा देखावा करने (Help) असे म्हणतात.  जास्त फायदा देण्याचे आमिष दाखवतात, अटक किंवा कायदेशीर कारवाईची भीती दाखवतात किंवा खोटी सहानुभूती दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून फसवतात.                                                जर कोणी ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला, तर त्यांनी तुरंत बँकेला अनधिकृत व्यवहाराची माहिती द्यावी, जेणेकरून कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग सारखे पेमेंट चॅनेल तात्काळ ब्लॉक करता येतील आणि पुढील आर्थिक नुकसान टाळता येईल. ग्राहकांनी यासोबतच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून फसवणुकीची तक्रार नोंदवावी. तसेच, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल https://www.cybercrime.gov.in वरही तक्रार दाखल करावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डीएसपी म्युच्युअल फंड सर्वेक्षण – बहुसंख्य महिला आता स्वतंत्र गुंतवणूक निर्णय घेतात

डीएसपी म्युच्युअल फंड सर्वेक्षण – बहुसंख्य महिला आता स्वतंत्र गुंतवणूक निर्णय घेतात क…