no images were found
अर्बन क्रूझर हायराइडरच्या सीएनजी व्हेरीयंटच्या किमती जाहीर केल्या
टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) अर्बन क्रूझर हायराइडरच्या सीएनजी व्हेरीयंटच्या किमती जाहीर केल्या आहे. टीकेएमने यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये टोयोटा ग्लान्झा आणि अर्बन क्रूझर हायराइडर लाँच करून सीएनजी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती.या बद्दल बोलताना कंपनीचे सेल्स आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग उपाध्यक्ष अतुल सूद यांनी टोयोटोचा नेहमी टिकाऊ गतिशील उपाययोजनांना चालना देण्याच्या प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून अर्बन क्रूझर हायराइडर लाँच करणे हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले. आज, आमच्या ग्राहकांसाठी सीएनजी व्हेरीयंटच्या किमती जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असे ते म्हणाले. या ग्राहकांनी लॉन्च झाल्यापासून उत्पादनामध्ये प्रचंड स्वारस्य दाखवले आहे.
टोयोटामध्ये, ‘कार्बन न्यूट्रल सोसायटी’ साकार करण्याच्या दृष्टीकोनासह, कमी-कार्बन ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्यास वचनबद्ध आहोत. अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजी व्हेरीयंट पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या व्यापक उपयोगाला प्रोत्साहन देईल. आणि ग्राहकांना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय देतील असे सूद यांनी स्पष्ट केले.या व्हेरीएंटमधील एकमेव असलेल्या अर्बन क्रूझर हायराइडर एस आणि जी या दोन्ही श्रेणींमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध आहे. दोन्ही श्रेणींमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) पॉवरट्रेनसह सुसज्ज, सीएनजी प्रकार सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक तसेच निओ ड्राइव्ह प्रकारांव्यतिरिक्त असेल, जे बाजारात आधीच उपलब्ध आहेत.
टीकेएमची बहुप्रतीक्षित एसयूव्ही जुलै २०२२ मध्ये लाँच करण्यात आली. तेव्हापासून, उत्पादनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांचा टोयोटा ब्रँड आणि त्याच्या प्रगत तंत्रज्ञानावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. टोयोटाच्या आश्वासक ऑफरपैकी एक म्हणून, नवीन अर्बन क्रूझर हायराइडरला त्याच्या बोल्ड आणि अत्याधुनिक स्टाइलिंग आणि प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह टोयोटाच्या जागतिक एसयुव्हीचा वारसा मिळाला आहे. यामुळे या विभागात एक उत्तम पर्याय मिळाला आहे. अर्बन क्रूझर हायराइडरमध्ये १७ अलॉयज ९ स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रिन ऑडिओ, ६ एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल आणि टोयोटा आय-कनेक्ट (कनेक्टेड डीसीएम-डेटा कम्युनिकेशन मॉड्यूल) यासह विभागातील इतर सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे भारतीय कार खरेदीदाराच्या विशिष्ट गरजांसाठी नवीन एसयूव्ही सर्वोत्कृष्ट आहे.अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये उपलब्ध नवीन सीएनजी व्हेरीयंट १.५-लिटर के-सिरीज इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे, तसेच उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि २६.६ किमी/केजीच्या मायलेजची खात्री करण्यासाठी उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे
ग्रेड | ट्रान्समिशन | किमती |
G | MT | 15,29,000 |
S | MT | 13,23,000 |