no images were found
एपीएसईझेडची मजबूत तिमाही कामगिरी; महसूलात 21% वाढ, लॉजिस्टिक्स आणि मरीन व्यवसायात लक्षणीय उडी
अहमदाबाद, : अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ने 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीने 9,126 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत झालेल्या 7,560 कोटी रुपयांच्या तुलनेत 21% अधिक आहे. एबिट्डा (व्याज, कर, घसारा आणि इतर खर्चांपूर्वीचा नफा) 13% वाढून 5,495 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी 4,848 कोटी रुपये होता. निव्वळ नफा (पीएटी) 7% वाढून 3,311 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 3,107 कोटी रुपये होता. कंपनीच्या लॉजिस्टिक्स व्यवसायात दुप्पट वाढ झाली असून मरीन व्यवसायात तब्बल 2.9 पट वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
एपीएसईझेडचे पूर्णकालीन संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अश्विनी गुप्ता यांनी सांगितले, “वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 21% महसूलवाढ ही आमच्या लॉजिस्टिक्स आणि मरीन व्यवसायातील जोरदार कामगिरीमुळे झाली आहे. हे व्यवसाय अनुक्रमे 2 पट आणि 2.9 पट वाढले आहेत. हे आता केवळ पूरक व्यवसाय राहिलेले नाहीत, तर आपल्या भविष्यासाठी तयार असलेल्या पोर्ट्स इकोसिस्टमला नवे रूप देत आहेत. ट्रकिंग आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा विस्तार तसेच एमईएएसए (MEASA) भागात झपाट्याने वाढणाऱ्या आणि विविध मरीन फ्लीटमुळे कंपनी ‘इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट युटिलिटी’ या मॉडेलला आणखी मजबूत करत आहे. या मॉडेलअंतर्गत पोर्टपासून थेट ग्राहकाच्या दारापर्यंतची मूल्यसाखळी (वॅल्यू चेन) विकसित केली जात आहे. देशांतर्गत पोर्ट व्यवसायात कार्गो वाढ, बाजारातील हिस्सा वाढणं, तसेच आंतरराष्ट्रीय पोर्ट्समधून वाढलेले उत्पन्न आणि सुधारलेला एबिट्डा यामुळे कंपनी वित्त वर्ष 2026 चे उद्दिष्ट पूर्ण आत्मविश्वासाने साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
लॉजिस्टिक्स व्यवसायात दुप्पट आणि मरीन व्यवसायात 2.9 पट वाढ झाली असून, हे दोन्ही आता कंपनीच्या वाढीचे मुख्य स्तंभ बनले आहेत. कंटेनर कार्गो, रेल्वे आणि जीपीडब्ल्यूआयएस वॉल्यूममध्येही मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत कार्गो मार्केटमधील कंपनीची हिस्सेदारी वाढून 27.8% झाली आहे.
हाइफा पोर्टने विक्रमी कामगिरी केली असून, मुंद्रा व कृष्णपट्टणम पोर्ट्सने उच्चतम मासिक वॉल्यूम हाताळले. कंपनीने ऑस्ट्रेलियातील एनक्यूएक्सटी पोर्ट अधिग्रहणास मान्यता दिली आहे. आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून, 15 वर्षांसाठी एलआयसीकडे 5,000 कोटींचे डिबेंचर इश्यू केले गेले, बॉण्ड रिटर्नमध्ये 116 बेसिस पॉइंट्सची घट झाली, तर नेट डेट-टू-एबिट्डा रेशो 1.8 पट राहिला.
ईएसजी क्षेत्रातही एपीएसईझेडने भरीव प्रगती केली आहे, जसे की 12 पोर्ट्सना झिरो वेस्ट टू लँडफिल प्रमाणपत्र मिळाले, आणि सीएसआर प्रकल्पांतर्गत पहिली स्टील स्लॅग रस्त्याची निर्मिती हजीरा पोर्टवर करण्यात आली. पुरस्कारांमध्येही एपीएसईझेड चमकले, जसे की इंडिया मेरीटाइम, आयएससीएमएल आणि ग्लोबल एन्वायर्नमेंट अवॉर्ड्समध्ये विविध श्रेणीत मान्यताप्राप्त झाली.