no images were found
जकार्ता इस्लामिक सेंटरला भीषण आग; जामी मशीद जमीनदोस्त
उ. जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका मशिदीला आग लागून या आगीमुळे मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.
जामी मशिदीच्या मोठ्या आकाराच्या घुमटाला आग लागली आणि काही मिनिटातच तो कोसळला. काल दु. 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या मशिदीच्या नूतनीकरणाचे बुधवारी काम सुरु होते. दुपारी ३ वाजता अचानक धुराचे लोट हवेत पसरताना दिसू लागले. धुराचे लोट दिसल्यानंतर आग लागल्याची माहिती सर्वदूर पसरली.
जकार्ता इस्लामिक सेंटर इमारतीच्या संकुलात ही मोठी जमा मशीद आहे. या आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढे सांगितले की, मशिदीचे नूतनीकरण करण्याचे काम असलेल्या कंत्राटदार कंपनीमधील ४ कामगारांची चौकशी करण्यात आली आहे. आग लागण्याचे कारणाचा तपास केला जात आहे. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.