no images were found
प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या
मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिसांनी काळाचौकी पोलिस स्थानकामध्ये पारस पोरवाल यांच्या मृत्यूची नोंद केली आहे. बिल्डर जगतासाठी पारस यांची आत्महत्या ही मोठी दुख:द घटना आहे. पारस पोरवाल हे दक्षिण मुंबई मधील प्रसिद्ध बिल्डर होते. पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या काळात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास सुरु असताना पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट मिळून आली. त्यावरून त्यांनी व्यवसायातील आर्थिक तोट्यामुळे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. या पत्रात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करू नये, असे नमूद केलेले आहे. नातेवाईकांकडून अक्षर ओळख पटलेली असून नातेवाईकांचा कोणावरही संशय नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.