no images were found
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – अजित पवार
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात गेले आठवडाभर थैमान घातले आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच खरिपाच्या कापूस पिकाचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अजित पवार यांनी मागणी केली आहे.
सोयाबीनची पूर्ण शेत पाण्याखाली गेलेले आहे तसेच काही कापसाची बोंडे अंकुरली असल्याचे वृत्त आहे. ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागणार आहे. पावसामुळे नुकसान झालेले पिक कमी भावात म्हणजे अगदी क्षुल्लक किमतीत विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
दरम्यान “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी करून युद्धपातळीवर पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल” असे सांगितले.