no images were found
मैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या वकीलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : दहावीतील अनेक माजी वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करून मानसिक त्रास देणाऱ्या य्र्थिल एका वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून अॅड. प्रशांत जीवन पाटील (रा. करण हेरिटेज, देवकरण पाणंद, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार पीडित महिला डाॅक्टर आहे. त्यांच्या दहावीच्या वर्गमित्रांचे गेट टुगेदर ८ मे २०२२ रोजी कळंब्यातील फार्म हाऊसवर झाले होते. या गेट टुगेदर दरम्यान, वकील प्रशांत पाटीलने त्या पीडित डाॅक्टर महिलेच्या जवळ जाऊन माझ्याशी शरीरसंबंध ठेव, नाहीतर तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या त्या महिलेनं कार्यक्रम संपून घरी गेल्यानंतर भीतीपोटी ही घटना पतीला सांगितली नाही.
तथापि महिनाभरानंतर पीडित महिला डाॅक्टरच्या एका मित्राने संबंधित वकील आणि आणखी एक मैत्रीण तिच्याबद्दल घाणेरडे बोलत असल्याचे सांगत क्लीपच दिली. त्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्याने महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यामुळे चिंताग्रस्त पतीने पत्नीला याबाबत विचारले असता तिने झाला प्रकार सागितला. त्यानन्तर कुटुबीयांनी थेट कोल्हापूर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची मंगळवारी भेट घेतली.
पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी त्या वकिलाविरोधात अनेक महिलांशी अश्लील संभाषण केल्याचे पुरावेच गोळा केले आहेत. त्यानंतर पोलिस ठाण्यात वकीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.