
no images were found
विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर साखर – पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर अखेर विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर यांनीही शिक्कामोर्तब केले. खरी शिवसेना हि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी वाद्याच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करत साखर पेठे वाटून आनंदोत्सव साजरा केला. निकालानंतर लगेचच शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाजवळ भगवे झेंडे फडकवीत “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर नागरिकांना शिवसैनिकांनी साखर – पेढे वाटले.
याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले असून यात, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मा.विधानसभा अध्यक्ष महोदयांनी दिलेल्या निकालाचे आम्ही सर्व शिवसैनिक, पदाधिकारी स्वागत करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला. यामध्ये शिवसेना वाढविण्यासाठी ज्यांनी आपली २५ – ३० वर्षे खर्ची केली शिवसेना वाढविण्यासाठी योगदान दिले त्यांनी मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला साथ दिली. आजचा निकाल हा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय असून, पुढील काळात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. येणाऱ्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा झंजावात पुन्हा निर्माण करून लोकसभा, विधानसभा यासह सर्वच निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून देईल, असे प्रतिपादन केले.
या आनंदोत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, पूजा अडदांडे, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, बांधकाम सेना जिल्हाप्रमुख सुहास साका, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख दीपक चव्हाण,रणजीत मंडलिक, सम्राट यादव, कपिल नाळे, मंदार तपकिरे, कपिल केसरकर, सुजय संकपाळ, कपिल सरनाईक, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, कुणाल शिंदे, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, विपुल भंडारी, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, शहरप्रमुख राजू पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, राजू कदम, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.