
no images were found
भाषेच्या आधारावर देश विश्वामध्ये अग्रस्थान निर्माण करेल-डॉ..एम.एस.देशमुख
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभाग,बैंक आॅफ बडोदा तर्फे मेधावी छात्र पुरस्काराचे वितरण. शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामध्ये विश्व हिंदी दिनानिमित्त बैंक आॅफ बड़ोदा तर्फे हिंदी विषयात प्रथम आलेल्या बिल्कीस गवंडी, जयसिंगपूर काॅलेज व अरविंद पाटील,देशभक्त आनंदराव बळवंतराव काॅलेज,चिखली यांना मेधावी छात्र पुरस्कार देण्यात आला.अध्यक्षस्थानी विद्यापीठातील कला शाखेचे डीन , डॉ.एम.एस.देशमुख होते.त्यांनी विद्यार्थ्यांना ,”देशाच्या प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच हिंदी भाषा देखील भारताला
विश्वात अग्रस्थान देईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहीले पाहीजे” हा कानमंत्र दिला. प्रमुख पाहुणे बैंक आॅफ बडोदा चे महाप्रबंधक श्री.एस.के.पलनीवेल हे आमंत्रित होते. विश्वातील हिंदीचे स्थान याविषयी बैंकेचे प्रबंधक मोहसीनखान शेख यांनी ज्ञानवर्धक भाषण दिले.विश्व हिंदी दिवसानिमीत्त आयोजित केलेल्या घोषवाक्य स्पर्धेत तस्बीरा शेख हिने प्रथम,तुषार शिंदे याने द्वितीय ,शुभम जीतकर याने तृतीय तर स्नेहल शाह हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.प्रभारी विभागप्रमुख डॉ.ए.एम.सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.प्रास्ताविक डॉ चंदा सोनकर यानी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.विजय सदामते यांनी करून दिला प्रकाश निकम यांनी आभार मानले.