Home क्राईम मंगळवारी मटण करण्याच्या कारणावरून पती-पत्नीच्या भांडनातून शेजाऱ्याचा खून

मंगळवारी मटण करण्याच्या कारणावरून पती-पत्नीच्या भांडनातून शेजाऱ्याचा खून

2 second read
0
0
142

no images were found

मंगळवारी मटण करण्याच्या कारणावरून पती-पत्नीच्या भांडनातून शेजाऱ्याचा खून

भोपाळ : येथे पती-पत्नीच्या भांडणात शेजार्याचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पती-पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीला मारत होता. ती वाचवा वाचवा ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावला. त्यानं वाद सोडवला आणि घरी परतला. थोड्या वेळानं पती त्याच्या घरात काठी घेऊन शिरला. त्यानं केलेल्या हल्ल्यात शेजाऱ्याच्या शेजार्याचा मृत्यू झाला. आरोपी पती पप्पू याला अटक करण्यात्म आली आहे.

या घटनेची माहिती पप्पूची पत्नी कुंती बाईनं पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी आखल होवून मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आला. आरोपीच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी पप्पूला अटक करण्यात आली. मी मंगळवारी घरात मटण तयार करत होतो. मात्र पत्नीनं विरोध केला. त्यामुळे वाद झाल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.

आरोपीच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील चतुर्वेदी यांनी दिली. पप्पू मजुरी करतो. मंगळवारी मटण तयार करण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडवायला आलेल्या बल्लूला पप्पूनं मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…