
no images were found
महानगरपालिका प्राथमिक शिक्षणसमिती मार्फत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणसमितीकडील प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया आज महापालिकेच्या वि.स.खांडेकर विद्यालयात संपन्न झाल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनानुसार व महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महापालिकेच्या एकाच शाळेत 07 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या 84 सहा.शिक्षक, 43 मुख्याध्यापकांसह 127 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. शिक्षण समितीने सर्वप्रथम बदलीस पात्र शिक्षकांची यादी तयार केली. बदलीची प्रक्रिया शाळा सुरु होण्यापूर्वी होणे अत्यंत आवश्यक होते. त्याप्रमाणे प्रशासनाने अगदी वेळेत शिक्षक बदली प्रक्रिया पार पाडल्याने शिक्षकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
सर्व कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतून शिक्षकांचे समानीकरण करणे आवश्यक होते. पदवीधर शिक्षक, गणित / विज्ञान भाषा व सहा. शिक्षक यांचा समतोल साधणे प्रशासनासाठी एक आव्हान होते. शिक्षकांना कामाचा अनुभव व कौशल्याच्या आधारे प्रशासनाने पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सदर प्रक्रिया पार पाडली. बदली प्रक्रिये दरम्यान संघटना, शिक्षकांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. बदली पात्र शिक्षकास स्क्रीनवरच सर्वासमोर, शाळा दाखवण्यात आल्या. त्यामुळे आपल्या सोयीने शिक्षकांना बदलीची शाळा निवड करणे सोपे झाले.
या प्रक्रियेसाठी सहा.प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, अजय गोसावी, सचिन पांडव, अविनाश लाड, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार, संजय शिंदे, राजेंद्र आपुगडे, शरद गावडे, भारती पाटील, आदिती जाधव, श्रावण कोकीतकर, अस्मा गोलंदाज, दिपाली नाईक, विक्रम भोसले, राजाराम हिंदि तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधी, शाळा मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.