Home मनोरंजन एण्‍ड टीव्‍हीवर होणार गोलमाल!

एण्‍ड टीव्‍हीवर होणार गोलमाल!

1 min read
0
0
57

no images were found

एण्‍ड टीव्‍हीवर होणार गोलमाल!

या आठवड्यात एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अनपेक्षित ट्विस्‍ट्स पाहण्‍यासाठी सज्‍ज राहा. प्रत्‍येक ट्विस्‍टमध्‍ये सरप्राइजेज आहेत, पण एक गोष्‍ट समान आहे, ती म्‍हणजे नॉन-स्‍टॉप मनोरंजन.

हप्‍पू की उलटन पलटन

कटोरी अम्‍माचा (हिमानी शिवपुरी) भाऊ अतबीर मामा हप्पूच्‍या (योगेश त्रिपाठी) बहुप्रतिक्षित बढतीसाठी त्याच्या गुरुजींना पाठवतो. गुरुजी सांगतात की आजच्या काळात विशेषतः मंत्र्याच्या शिफारशीनुसार बढती होत नाही. ते एक विचित्र उपाय सांगतात: हप्पूने कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण न देता फक्‍त बनियान आणि अंडरपँट घालून फिरावे! हप्पू त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही आणि गुरुजींना चुकीचे सिद्ध करण्याचे ठरवतो. तो एका वॉन्टेड गुन्हेगाराला अटक करतो आणि त्याच्या बढतीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करतो. पण धक्‍कादायक म्हणजे, तो गुन्हेगार त्याच मंत्र्याचा मेहुणा निघतो, जो त्याला मदत करणार होता. मंत्र्याला राग येतो आणि तो हप्पूला पदावनत करतो! गुरुजी बरोबर होते याची आता पूर्ण खात्री पटलेला हप्पू त्यांच्या विचित्र सल्ल्याचे पालन करण्यास होकार देतो. दरम्यान, मुले गुरुजींना सांगतात की ते त्यांच्या परीक्षांमध्ये क्‍वचितच उत्तीर्ण होतात. यावर उपाय म्हणून गुरुजी सुचवतात की हृतिक (आर्यन प्रजापती), चमची (झारा वारसी) आणि रणबीर (सोम्या आझाद) यांनी त्यांच्या वडिलांना ‘पापा’ बोलणे थांबवावे आणि त्‍याऐवजी ‘चाची’ म्हणावे! तो त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा कधीही ‘पापा’ म्हणू नये अशी सक्त ताकीद देतो. गुरुजी मलायकाच्या (सोनल पनवार) भविष्याबद्दलही भाकीत करतात, म्हणतात की ज्या माणसाशी ती लग्न करणार आहे तो दुसऱ्या दिवशी तिच्यावर हल्ला करेल. दरम्यान, दोन चोर हप्पूच्‍या घरी चोरी करण्‍याचा विचार करतात. त्याच वेळी, हप्पू राजेशसाठी (गीतांजली मिश्रा) फुले घेण्यासाठी जातो. एक चोर अंधाऱ्या खोलीत घुसतो आणि राजेश त्‍याला हप्पू समजून त्‍याच्‍यासोबत रोमांस करू लागते आणि गाणे देखील गाते. पण तेवढ्यात खरा हप्पू दार वाजवतो. हप्पूला बाहेर पाहून राजेश ओरडते आणि वळून पाहते की चोर खिडकीतून पळून जात आहे. हप्पू त्याच्या बनियान व अंडरपँटमध्ये फिरत असताना चोर त्याच्या हातात चोरीची पर्स देतो आणि पळून जातो. गोंधळलेला जमाव हप्पूला चोर समजतात आणि त्याला बेदम मारहाण करतात. या घटनेनंतर कमिशनर (किशोर भानुशाली) हप्पूला फटकारतो आणि रागाच्या भरात त्याला घरी पाठवतो. घरी,अवधेशचा (उर्मिला शर्मा) मित्र आणि जावई येतो. हप्पूला नोकर समजून ते त्याच्याशी गैरवर्तन करतात. मुले त्याला “चाची” म्हणत राहतात, ज्यामुळे तो पूर्णपणे गोंधळून जातो. नंतर, मलायका ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याला भेटते, पण त्यांना कळते की तो तिला बहीण मानतो. गुरुजी नंतर एका खरेदीदारासह परततात, सर्वांना घर तातडीने विकण्याचा आग्रह करतात, त्यांनी तसे केले नाही तर मोठ्या संकटात सापडण्‍याचा इशारा देतात. ते कवडीमोल किमतीत घर विकण्याचा सल्ला देतात. घरातील सदस्‍य गुरूजींच्‍या म्हणण्याशी सहमत होतील का आणि त्यांचे घर गमावण्याचा धोका पत्करतील का?

भाबीजी घर पर है

विभुती (आसिफ शेख) हरवलेले पाकीट त्याच्या मालकाला परत करतो. विभुतीच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन तो विभुतीला त्याच्या दुकानात भागीदारी ऑफर करतो. विभुती याला सुवर्णसंधी मानून होकार देतो. दरम्यान, अंगूरी (शुभांगी अत्रे) तिवारीला (रोहिताश्‍व गौड) सांगते की, तिला घरकामाचा कंटाळा आला असल्‍यामुळे बाहेर जाऊन काम करायचे आहे. तिवारी सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर ही कल्पना मांडल्याबद्दल तिला फटकारतो. दुसरीकडे, सक्सेना (सानंद वर्मा) अनिताकडे (विदिशा श्रीवास्तव) तिच्या ग्रूमिंग क्लासेसशी संबंधित काही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्‍यासाठी जातो. तो इशारा देतो की समस्या सोडवली नाही तर क्‍लासेसना सील लागू शकते. अनिता चिंतित होते. विभुती तिला त्याच्‍या नवीन व्यवसायाबाबत सांगतो, तेव्हा ती त्याची थट्टा करते, ज्यामुळे विभुती खूप दुखावला जातो. डेव्हिड चाचा (अनुप उपाध्याय) विभुती आणि अनिता दोघांशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, पण ते दोघेही काहीच ऐकून न घेता निघून जातात, ज्यामुळे डेव्हिड चाचा देखील तितकेच दुखावले जातात. विभुती अंगुरीसाठी लाडू घेऊन जातो, पण ती नाराज दिसते. विचारल्यावर विभुतीला समजते की तिवारीने तिला काम करण्यास मनाई केली आहे. विभुती तिला लगेच त्याची चीफ सेल्सगर्ल म्हणून कामावर ठेवतो. दुसऱ्या दिवशी अंगूरी विभुतीच्या दुकानात काम करायला सुरूवात करते. हे पाहून तिवारी रागावतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्‍न करतो, पण अंगूरी त्‍याचे काहीच ऐकत नाही. हताश होऊन तिवारी हप्पूला (योगेश त्रिपाठी) लाच देतो आणि त्याच्याकडे मदत मागतो. हप्पू त्याला आश्वासन देतो की, अंगूरी एका तासात घरी परत येईल. पण हप्‍पू विभुतीच्या दुकानात जातो तेव्हा विभुती त्याला आणखी मोठी लाच देतो. हप्पू लाच स्वीकारतो आणि निघून जाताना म्हणतो, “भाबीजी समजदार आहेत आणि स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.” रागावलेला व पराभूत झालेला तिवारी अनिताकडे जातो आणि तिला त्याच्या दुकानात नोकरी देतो. आश्‍चर्य म्हणजे, अनिता होकार देते. दुसऱ्या दिवशी ग्राहक विभुती आणि तिवारीच्या दुकानात विभागले जातात. ही वाढती स्पर्धा बाजारातील इतर दुकानदारांना सहन होत नाही. स्थानिक दुकानदार त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. त्याच दिवशी संध्याकाळी विभुती आणि तिवारी त्यांची दुकाने बंद करून घरी जात असताना दुकानदार त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना मारहाण करतात, तसेच त्यांना दोन्ही भाबीजींना कामावरून काढून टाका अशी धमकी देतात. घरी परतल्यावर विभुती आणि तिवारी दोघेही अंगूरी आणि अनिता यांना त्यांच्या नोकरी सोडण्यास सांगतात. हे ऐकून दोघीही रागावतात आणि कारण विचारतात. शेवटी ते दोघेही सत्‍य सांगतात की बाजारातील दुकानदार त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांचा व्यवसाय बंद होण्‍याच्‍या मार्गावर आहे. तेवढ्यात, एक दुकानदार येतो आणि विभुतीकडे दुकानाच्या चाव्या देण्याची मागणी करतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…