no images were found
नगररचना विभागाकडे 56 नागरीकांच्या तक्रारी प्राप्त
कोल्हापूर :- प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सचूनेनुसार नगररचना विभागाकडे बांधकामाबाबत व इतर अनुषंगीक तक्रारींबाबत आयोजीत केलेल्या विशेष कॅम्पमध्ये 56 नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 7 या वेळेत नगररचना कार्यालयात नागरीकांच्या तक्रारी स्विकारल्या. त्यापैकी बहुतांश अर्ज हे अनाधिकृत बांधकाम कार्यावाहीशी संबंधीत होते. याबाबत आवश्यक त्या साईड व्हिसीट करून त्यासंबंधीत नोटीस देणे, त्यावरती विहित मुदतीत कार्यवाही करणे, हदीबाबत वाद, गुठेंवारी, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रकरणे तसेच वहिावाटीच्या हद्दीतला फरक, मुख्यत्वे करून अनाधिकृत बांधकामावरती चर्चा झाली. त्यामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सविस्तर आढावा घेऊन अनाधिकृत बांधकामांना नोटीस देणे, कार्यवाही करणे, हद्दीचे वाद संबंधित विभागाकडून सोडवून घेणे, काही ठिकाणी अनाधिकृत बांधकामाबाबत साईड व्हिजीट करून विहित करणे. या बाबत प्रशासक यांनी सहायक संचालक नगररचना व विभागाकडील कनिष्ठ अभियंता यांना दिल्या.
या व्हिजिटर्स डे साठी सहा. संचालक नगररचना विनय झगडे, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, सुनिल भाईक, सुरेश पाटील, चेतन आरमाळ, अक्षय आटकर, सौ.मयुरी पटवेगार उपस्थित होते.