
no images were found
शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज पाहणी केली. यामध्ये महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 या ठिकाणची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतिश फप्पे, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
राजारामपूरी येथील मातंग वसाहत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मंजुर असलेल्या आण्णाभाऊ साठे हॉलच्या कामाची पाहणी करुन कोटीतिर्थ तलावाच्या झालेल्या कामाची पाहणी करुन या कामाची माहिती घेवून आवश्यकता असल्यास आणखीन सुशोभिकरण या ठिकाणी करण्याच्या सुचना दिल्या. विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत सी.एस.आर फंडातून होणाऱ्या ताराराणी चौक सुशोभिकर, विभागीयीय कार्यालय क्र.1 अंतर्गत वारे वसाहत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत शौचालयाची पाहणी केली व तेथील नागरीकांच्या समस्या जाणुन घेवून त्याचे निरांकरण करण्याच्या सुचना शहर अभियंता व उपशहर अभियंता यांना दिल्या. महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्तर अभियांना अंतर्गत राज्यस्तरावर मंजुर असलेल्या रस्त्यावरील सुरु असलेल्या सर्व्हेच्या कामाची पाहणी करुन जागेवरील समस्यांची माहिती घेवून त्यावर कायम स्वरुपी काम सुरु असत्तांना कोणता तो योग्य तोडगा काढुन काम त्वरीत सुरळीत करण्याच्या सुचना प्रशासक यांनी दिल्या. तसेच महालक्ष्मी तिर्थक्षत्र विकास आराखडा अंतर्गत् सुरु असलेल्या पार्किंग कामाची पाहणी केली व ठेकेदारांना त्वरीत काम करण्याचे सुचना दिल्या. कपिल तिर्थमार्केट येथील भाजी मंडईतील दुरुस्ती व डागडूजी बाबत प्रत्यक्ष काय कारवाई करता येते याबाबतचा प्रस्ताव ठेवण्याच्या सुचना शहर अभियंता व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच महालक्ष्मी मंदिर सभोवती मंजुर असलेल्या प्रस्तावीत चॅनल गटर्स कामाची पाहणी करुन काम त्वरीत करण्यात यावे अशा सुचना देवून मंजुर असलेल्या सर्व कामांचा दर्जा व गुणवत्ता राखणे बाबतच्या सुचना उपशहर अभियंता यांना दिल्या.
तसेच भास्कराव जाधव वाचनालय येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींची संवाद साधुन त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त आणखी जनरल पुस्तके व इतर गोष्टीसाठी मागणी करावी. त्या प्रमाणे संबंधीत अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही पुस्तके अथवा संदर्भ ग्रंथाचा तुतवढा भासणार नाही याबाबत त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद सादुन त्याना आश्वासीत केले