no images were found
महापालिकेतील 526 रोजंदारी कर्मचा-यांना किमान वेतन लागू
कोल्हापूर : महानगरपालिकेकडे पवडी, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा या विभागाकडे 526 रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना जुलै 2023 पासून महापालिकेच्यावतीने किमान वेतन सुधारीत दर लागू करण्यात आलेला आहे. यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मान्यता दिली असून त्यानुसार त्यांना त्यांचे सुधारीत वेतन नोंव्हेबर महिन्यापासून पगारात समाविष्ठ करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने प्रति कर्मचारी महिन्याला 2340 वाढ झाली आहे. सर्व 526 कर्मचा-यांना महिन्याला 9.50 लाख वाढ झाली आहे. त्याचबरोबर मागील फरकापोटी सुमारे 40 लाखाचा फरक अदा केला जाणार आहे.