no images were found
जोगेश्वरीचा पती भैरवनाथ साजरे करत आहे त्यांचे मालिकेचे १०० भाग
शेमारू मराठीबाणावरील ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या आकर्षक कथेत, जोगेश्वरी आणि भैरवनाथ एका परिवर्तनीय भावनिक प्रवासाला सुरुवात करत असताना कथानक एक आनंददायी वळण घेते. मालिकेच्या लोकप्रियतेने सीमारेषा ओलांडली आहे व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. ह्या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केल्यामुळे, या आनंदाच्या क्षणी, जोगेश्वरी (क्षमा देशपांडे), महादेव (रोहन एक्के), पार्वती (श्वेता नाईक), नंदी (सुप्रीत निकम) ह्या कलाकारांनी खरसुंडी गावातील ऐतिहासिक सिद्धनाथ मंदिराला भेट दिली. सांगली जिल्यातील सिद्धनाथ हे भगवान शंकराचे रूप मानले जाते.
‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या मालिकेमधील पात्रांना लोकप्रियता मिळाल्याने लोकांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्या प्रेमात वाढलेल्या पात्रांचे कौतुकही केले. अभिनेत्री क्षमा देशपांडे, तिच्या चाहत्यांसोबतच्या एका अविस्मरणीय भेटीबद्दल प्रतिबिंबित करताना, तिचा उत्साह व्यक्त करताना म्हणाली, “आमच्या शोचे १०० भाग पूर्ण करणे हा एक आनंदाचा टप्पा आहे आणि सिद्धनाथ मंदिराची आमची भेट हा एक दैवी अनुभव होता. आम्ही सकारात्मक उर्जेने घेरलो होतो.
ती पुढे म्हणते, “खरसुंडी मधली भेट ही केवळ एक सहल नव्हती. आमच्या चाहत्यांचे आमच्याबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि कौतुक हा एक मनसोक्त अनुभव होता. आमच्या पात्रांनी पडद्यावर केवळ चाहत्यांची मने जिंकली नाहीत तर, त्यांची जाणीव करून दिली आहे. खरसुंडी सोडून आम्ही केवळ सिद्धनाथांचे आशीर्वाद घेत नाही तर आठवणीही जपत आहोत.” ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या मनमोहक कथेत मग्न व्हा दर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता, केवळ शेमारू मराठीबाणावर.