no images were found
सलग दुस-या दिवशी 30 अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई
कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सलग दुस-या दिवशी 30 अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई मथुरा नगरी, सी.पी.आर कॉलनी, गगनगीरी पार्क, श्रृष्ठी पार्क, महेशवर कॉलनी या शहरालगतच्या ग्रामीण भागात करण्यात आली. यामध्ये निलेश निकम, सीमा रणदीवे, आकाश माने, बळवंत सुर्यवंशी, अंजुम मनेर, मारुती सनदी, संतोष जाधव, महादेव पोवार, राजेश पोवार, डॅनियल लोखंडे, पांडूरंग शेळके, राजू शेळके, रंगराव बोडके, विठठल गावडे, सुरेश गावडे, हौसाबाई बोडके, बजरंग बावधने, संजयराव देवणे, राजेपावना पावना, कानु डफडे, विकास काळगावकर, पांडूरंग धोमे, धावू बरगे, मोतिराम गावडे, भिकाजी गावडे, नावू झोरे, कोळा अपटे, गनपती बोडके, धोंडीराम बोडेकर, गंगाराम बरगे या लोकांची अनाधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली. यावेळी या सर्वांना दंडात्मक कारवाईची 7 दिवसांची नोटीस लागू करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रिया पाटील, पाणीपट्ठी अधिक्षक प्रशांत पंडत, ए वॉर्ड गांधीमैदान विभागातील सर्व मिटर रिडर व सहाय्यक, फिटर यांनी केली .
तरी सदरची मोहिम यापूढेही पाणी पुरवठा विभागामार्फत चालू राहणार असलेने, शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांनी रितसर महानगरपालिकेची परवानगी घेवून, आवश्यक ती फी भरून आपले कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अन्यथा त्यांचे पाणी कनेक्शन खंडीत करणेत येईल असे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.