no images were found
महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला
कोलहापूर (प्रतिनिधी): श्री भास्करराव जाधव वाचनालयाची स्थापना सन 1952 मध्ये झाली आहे. श्री भास्करराव जाधव वाचनालयाच्या स्थापनेपासून समाज प्रबोधनासाठी वेळोवेळी अनेक तज्ज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित केली जात होती. सन 1985 पासून प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील थोर व नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली जातात.
यावर्षी शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 ते बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.00 वाजता पाच व्याख्यात्यांची व्याख्याने संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे आयोजित करणेत आली आहेत. यामध्ये शनिवार दि.23/12/2023 रोजी डॉ.राजन गवस (गारगोटी) जेष्ठ साहित्यिक (विषय- कोल्हापूर छ.शाहूंचे राहिले आहे काय !), रविवार दि. 24/12/2023 रोजी चंद्रकांत निंबाळकर (पुणे) व्याख्याते जीवन विद्या मिशन (विषय- कुटुंब आणि सामाजिक स्वास्थ्य), सोमवार दि.25/12/2023 रोजी मा.मधूसुदन सुर्वे (खेड शिवतर रत्नागिरी) शौर्य चक्र विजेता पॅरा कमांडो (विषय -मातृभूमीसाठी सर्वस्व), मंगळवार दि.26/12/2023 रोजी मा.डॉ.रमेश जाधव (कोल्हापूर) जेष्ठ साहित्यिक (विषय -छत्रपती शिवरायांचा अपरिचित इतिहास), बुधवार दि. 27/12/2023 रोजी महेश झगडे (पुणे) सेवानिवृत्त सनदी अधिकारी (विषय- लोकशाही आणि प्रशासन).
तरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्री भास्करराव जाधव वाचनालयाकडून आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला 2023 साठी नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
00000000