
no images were found
येत्या तीन महिन्यात शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी): -सन २०१९ व २०२१ ची महाभयंकर पूरस्थिती कोल्हापूर शहराने अनुभवली आहे. या महापुरांमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरवासियांसह, पर्यटक, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करणे या कामास जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेतून रु.१ कोटी २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा शुभारंभ आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कि, गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रमुख १६ रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रु.१०० कोटींचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासह शहरातील इतर प्रमुख मार्गही सुस्थितीत यावेत यासाठी प्राधान्य दिले जात आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा शहरातील प्रमुख मार्ग असून, यासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून येत्या काही महिन्यात हा रस्ता रहदारीसाठी दर्जेदार झालेला दिसून येईल. त्याचबरोबर शहरातील इतर प्रमुख मार्गही येत्या तीन महिन्यात सुस्थितीत आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, बाबा पार्टे, सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, हिंदुत्ववादी संघटनेचे शाम जोशी, राजू मेवेकरी, इंद्रजीत आडगुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, किशोर घाटगे, सुनील जाधव, गणेश रांगणेकर, सचिन पाटील, निरंजन शिंदे, प्रसन्न शिंदे, पांचाळ सोनार समाजाचे अनिल पोतदार, कपिल सरनाईक, योगेश चौगले, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, मनोज बहीरशेट आदी उपस्थित होते.
मा.श्री.राजेश