Home मनोरंजन ‘वीर हनुमान’मध्ये आपले आराध्य दैवत श्रीरामाला भेटण्यास निघाला हनुमान

‘वीर हनुमान’मध्ये आपले आराध्य दैवत श्रीरामाला भेटण्यास निघाला हनुमान

1 second read
0
0
48

no images were found

‘वीर हनुमान’मध्ये आपले आराध्य दैवत श्रीरामाला भेटण्यास निघाला हनुमान

मुंबई,: भक्ती आणि दिव्य नियती यांची हृदयस्पर्शी कथा विशद करून सोनी सबवरील वीर हनुमान मालिकेने आपल्या प्रेक्षकांना प्रभावित आणि प्रेरित केले आहे. या मालिकेत आन तिवारी छोट्या हनुमानाच्या भूमिकेत आहे, तर सायली साळुंखे आणि आरव चौधरी अनुक्रमे माता अंजनी आणि केसरीची भूमिका करत आहेत. तरुण खन्ना भगवान शिवाच्या रूपात दिसत आहेत आणि माहिर पांधी वाली आणि सुग्रीव यांची दुहेरी भूमिका करत आहे. मालिका आता एका दिव्य टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, हनुमान अयोध्येला पोहोचला आहे, पण हनुमान-श्रीरामाच्या (तन्मय नानी) भेटीत देव काही ना काही विघ्न उभे करत आहेत.

मनातील निःस्सीम भक्तीने प्रेरित झालेला हनुमान श्रीरामाला भेटण्यासाठी सतत एकामागून एक आलेल्या विघ्नांवर मात करत आहे. तो रानावनातून एकाकी, उपाशी भटकत आहे, भयंकर संकटे त्याच्यापुढे येत आहेत मात्र तरीही त्याचा निर्धार डळमळीत होत नाही आणि तो अत्यंत श्रद्धेने आपला प्रवास सुरूच ठेवतो. श्रीरामासाठी एक फुलांचा हार करण्याच्या त्याच्या प्रयत्नांत त्याच्यापुढे नवी विघ्ने उभी राहतात. आपल्या मार्गात त्याला एक गूढ पण दयाळू स्वभावाची व्यक्ती भेटते. ही व्यक्ती त्याला भक्तीचा गहन अर्थ जाणण्यास मदत करते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भोला रूपातील साक्षात भगवान शिव असते, पण त्याबद्दल हनुमान मात्र अनभिज्ञ आहे. या भेटीनंतर हनुमानाला हे ज्ञान होते की, खरी भक्ती संपूर्ण शरणागतीत असते; आपला अहंकार, भीती आणि शंका सोडून देण्यात असते- आणि निर्मळ मनाने श्रीरामाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यात असते.

भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता तरुण खन्ना म्हणतो, “जेव्हा जेव्हा मी रुद्राक्ष घालतो आणि महादेवाच्या भूमिकेत शिरतो, तेव्हा मनात एक जबाबदारीची जाणीव येते. मन श्रद्धेने भरून जाते. या भूमिकेसाठी केवळ संवाद बोलून आणि कृती करून चालत नाही, तर भगवान शंकरात असलेली अथांग शांतता, करुणा आणि विश्वव्यापक शक्ती देखील मनातून अनुभवावी लागते. आगामी भागांमध्ये, मी भोला या रूपात प्रकट होणार आहे. भोला एक विनम्र आणि गूढ माणूस आहे, जो हनुमानाला भक्तीचे रहस्य समजावून देतो. या कथानकात एक सार्वत्रिक संदेश आहे की, खरी भक्ती ही विराट कृतीमध्ये नसून आपला अहंकार समर्पित करण्यात आणि दिव्य प्रेमावर श्रद्धा ठेवण्यात आहे. मी स्वतः एक पिता असल्यामुळे, या कथा आपल्याशी खोलवर निगडीत आहेत. मला कित्येकदा वाटते की मी माझ्या मुलाला कशा रीतीने मार्गदर्शन करतो – जबरदस्तीने नाही, तर प्रेमाने आणि मी त्याला नीट समजावून सांगतो अगदी ज्याप्रमाणे भगवान शिव आपल्या भक्ताला मार्गदर्शन करतात

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…