
no images were found
PFI कडून जीवाला धोका; सरकारने RSS नेत्यांची सुरक्षा वाढविली
केरळमधील आरएसएस नेत्यांच्या जीवाला पीएफआयकडून धोका असल्याचे एनआयएच्या अहवालात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. या माहितीनंतर केंद्र सरकारनं केरळच्या 5 आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे.
एनआयए आणि आयबीच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 नेत्यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत निमलष्करी दलाचे कमांडोही तैनात करण्यात येणार आहेत.
तसे पाहता केरळमधील आरएसएसचे नेते पीएफआयच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेनं तसा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरावर छापेमारी करताना एनआयएला आरएसएस नेत्यांची यादी मिळाली, यामध्ये आरएसएसच्या 5 नेत्यांच्या हत्येचा कट होता. त्यामुले केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या पाचही नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आलेली आहे.