
no images were found
सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडे (वय ५०) यांचे नुकतेच निधन झाले. ते जीममध्ये व्यायाम करत असाताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सलमाननेही याबाबत एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘बजरंगी भाईजान’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमांसाठी सागर पांडेने सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केलेले आहे. सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून त्याची ख्याती होती. सागर हा जिममध्ये वर्क आऊट करताना त्याच्या छातीत अचानक वेदना जाणवून ते बेशुद्ध झाले. त्यांना जोगेश्वरीमधील बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. सागरने १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉडी डबल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्याच्या निधनानंतर सलमान खानने एक भाऊक पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.