no images were found
नवे आधार कार्ड काढताना ‘पासपोर्ट’सारखी होणार ‘पडताळणी’!
नवी दिल्ली : पासपोर्ट तयार करताना ज्या पद्धतीने होते. वस्तुनिष्ठ माहितीची पडताळणी केली जाते. तसेच व्हेरिफिकेशन आता आधार कार्ड काढताना प्रौढ नागरिकांची होणार आहे. लवकरच युआयडीएआय हा बदल करणार आहे.
भारत सरकारकडून नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा म्हणून आधार कार्डची निर्मिती केली.भारतीय विशिष्ट ओळख प्राधीकरणद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेला १२ अंकी ओळख क्रमांक. आधार कार्ड हे प्रत्येक कार्यालयीन कामासाठी आवश्यक असं महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँकिंग ते डिजिटल व्यवहारांपर्यंत प्रत्येक व्यवसायासाठी आधार कार्ड आवश्यक असतं. ‘युआयडीएआय’ने नवे आधार कार्ड तयार करण्यासाठी आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बदल प्रौढ म्हणजे १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. पासपोर्ट तयार करताना ज्या पद्धतीने कागदपत्रांची तपासणी केली जाते. सत्यता तपासली जाते. तसेच ‘पडताळणी’आता आधार कार्ड काढताना होणार आहे. युआयडीएआयचे उपमहासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यस्तरावर एक अधिकारी नेमला जाईल. १८ वर्षावरील व्यक्ती आधार कार्डसाठी अर्ज करेल तेव्हा तो अर्ज राज्य स्तरावरील अधिकारी यांच्याकडे जाईल.
त्यानंतर तो अर्ज जिल्हा स्तरीय नेमलेल्या अधिकाऱ्याकडे वर्ग केला जाईल. पुढे तालुकास्तरावर अर्जाचे दावे योग्य आढळल्यास आधार बनविण्याची प्रक्रिया सुरू होईल. १८ वर्षावरील नागरिकांसाठी आधार कार्डसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केलं जात आहे. ‘युआयडीएआई’नुसार हे पोर्टल जवळपास तयार झालं असून, आता लवकरची याची अंमलबजावणी होणार आहे.