Home क्राईम ओडिशामध्ये प्लॅटफॉर्मवर मालगाडी घसरून तीन प्रवासी ठार, दोघे गंभीर

ओडिशामध्ये प्लॅटफॉर्मवर मालगाडी घसरून तीन प्रवासी ठार, दोघे गंभीर

13 second read
0
0
101

no images were found

ओडिशामध्ये प्लॅटफॉर्मवर मालगाडी घसरून तीन प्रवासी ठार, दोघे गंभीर

जाजपूर : ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कोराई रेल्‍वे स्टेशनवर मालगाडीचा रूळावर घसरून अपघात झाला. प्लॅटफॉर्म रेल्‍वे गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर मालगाडी उलटली. यामध्‍ये तीन प्रवासी ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. सोमवार दि.२१ सकाळी ही दुर्घटना झाली.
सोमवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मालगाडी रूळावरून घसरली. प्लॅटफॉर्मवर उभ्‍या असलेल्या प्रवाशांना चिरडत मालगाडीने तिकिट खिडकीला धडक मारली. भुवनेश्वरला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी या अपघातात जखमी झाले. मालगाडीची एक बोगी वेगाने पलटी होत ब्रिजला धडकली. या अपघातानंतर कोसळलेल्‍या छताखाली अडकलेल्‍या लोकांना वाचवण्यासाठी इतर प्रवाशांनी धाव घेतली. यातील जखमी प्रवाशांना तातडीने रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…